नवी दिल्ली : ‘देशाला विभाजनवादाचा धोका असून हे घटक आपल्या वैविधपूर्ण संस्कृतीचा आपल्याच विरोधात गैरवापर करत आहेत. धर्मा-धर्माना, जाती-जातींना, भाषा-भाषांना, राज्या-राज्यांना एकमेकांविरोधात लढवले जात आहे. लोकामध्ये असुरक्षितता आणि भीती निर्माण करून एकमेकांविरोधात द्वेषाचे बीज पेरले जात आहे. पण, द्वेषाच्या राजकारणाला मर्यादा असतात. द्वेषाचे राजकारण फार काळ चालणार नाही, याची मला या यात्रेमुळे खात्री झाली आहे’, अशी आशा राहुल गांधी यांनी देशवासींना लिहिलेल्या पत्रात व्यक्त केली आहे.
कन्याकुमारी ते काश्मीर अशी साडेतीन हजार किमीची ही यात्रा आता अंतिम टप्प्यामध्ये असून २६ जानेवारी रोजी काँग्रेसच्या ‘हाथ से हाथ जोडो’ या जनमोहिमेची सुरुवात होणार आहे. या जनमोहिमेच्या माध्यमातून राहुल गांधींचे पत्र घरोघरी पोहोचवले जाणार आहे. समाजांमधील द्वेष आणि मतभेदांचा देशाच्या विकासावर विपरित परिणाम होऊ लागला असल्याचे प्रत्येकाला जाणवू लागले आहे. जात, धर्म, भाषा, प्रांत यांच्यामध्ये मतभेद निर्माण करणाऱ्या घटकांवर आपण सगळे मात करू हा विश्वास वाटतो. विविधतेमध्ये ऐक्य हेच आपल्या देशाचे वैशिष्ट आहे. कोणालाही घाबरू नका, मनातील भीती काढून टाका. असे झाले तर समाजातून द्वेष आपोआप नष्ट होईल, असे राहुल गांधींनी पत्रात नमूद करत भाजप व केंद्र सरकारवर अप्रत्यक्ष टीका केली.
सध्या देश आर्थिक संकटात सापडला आहे. बेरोजगारी, महागाईचा प्रश्न गंभीर बनला आहे. शेतकरी कर्जात बुडाला आहे. काही मोजक्या उद्योजकांच्या हाती संपत्ती एकवटलेली आहे. लोकांना नोकरी जाण्याची भीती आहे, उत्पन्न कमी होत आहे, उज्ज्वल भविष्याची त्यांना चिंता वाटू लागली आहे. देशात चहूबाजूला निराशा दिसू लागली आहे, असे राहुल गांधींनी म्हटले आहे.
माझ्या आयुष्यातील ही यात्रा सर्वात महत्त्वाची यात्रा होती. मी या प्रवासामध्ये लोकांचे विचार, त्यांची गाऱ्हाणी ऐकली आहेत. म्हणूनच मी रस्त्यावर उतरून संघर्ष करेन, संसदेच्या माध्यमातूनही लोकांचा आवाज केंद्र सरकापर्यंत पोहोचवेन. सामाजिक सौहार्द, आर्थिक समृद्धीसाठी समान संधी मिळेल, शेतीमाला योग्य किंमत मिळेल, तरुणांना रोजगार मिळेल, छोटय़ा-मध्यम उद्योगांना चालना मिळेल, डिझेल-पेट्रोल स्वस्त असेल, डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत असेल, गॅस सिलिंडरची किंमत ५०० रुपयांपेक्षा जास्त नसेल, अशा समाजभिमुख भारत बनवण्यासाठी मी कटिबद्ध आहे, असे विचार राहुल गांधींनी मांडले आहेत.
‘यात्रा ही तपस्या’
‘भारत जोडो’ यात्रेने मला लोकांसाठी संघर्ष करण्याचे बळ दिले आहे. ही यात्रा माझ्यासाठी तपस्या आहे. हक्कांसाठी लढणाऱ्या दुबळय़ांसाठी मी ढाल असेन, त्यांचा आवाज दाबला जात असेल तर मी त्यांचा आवाज असेन. माझ्या वैयक्तिक आणि राजकीय जीवनाचे लक्ष्य दुबळय़ांसाठी संघर्ष करणे हेच आहे. ही अनुभूती मला यात्रेने दिली. देशाला अंध:कारातून उज्ज्वल भविष्याकडे, द्वेषातून प्रेमाकडे आणि निराशेतून आशेकडे घेऊन जाण्याचे स्वप्न मला साकार करायचे आहे. देशासाठी संविधानाचा निर्मिती करणाऱ्या महापुरुषांच्या विचारांच्या आधारे मार्गक्रमण करेन, अशी ग्वाही राहुल गांधींनी दिली.
काँग्रेसचा संघर्ष हिताचाच- ममता बॅनर्जी
भारत जोड यात्रेला असलेला काही विरोधी पक्षांचा विरोध आता मावळू लागला आहे. काँग्रेस रस्त्यावर उतरून संघर्ष करत आहे, ही चांगली बाब म्हणावी लागेल, अशी टिप्पणी तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी केली आहे. काँग्रेसची यात्रा श्रीनगरमध्ये समाप्त होत असून त्यानिमित्त २१ राजकीय पक्षांना सहभागी होण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. काश्मीरमधील अखेरच्या टप्प्यात सहभागी होण्याचे निमंत्रण अजून तृणमूल काँग्रेसने स्वीकारलेले नसले तरी, सामील होण्याची शक्यता नाकारलेली नाही. उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाने यात्रेत सहभागी होण्यास नकार दिला होता. मात्र, त्याचा पुनर्विचार केला जाऊ शकतो, असे संकेत सपचे प्रमुख अखिलेश यादव यांनी दिले आहे.