पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विजयी रथ रोखण्यासाठी एकत्र आलेल्या विरोधी पक्षांची बंगळुरू येथे संयुक्त बैठक नुकतीच पार पडली आहे. या आघाडीची आता पुढची बैठक मुंबईत होणार असल्याचं काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी जाहीर केलं. तसेच, या आघाडीला INDIA (Indian National Development Inclusive Alliance) हे नाव दिलं असल्याचंही त्यांनी जाहीर केलं. यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही आपलं मत व्यक्त केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यावेळी राहुल गांधी म्हणाले, “आमची लढाई भाजपाची विचारधारा आणि त्यांच्या विचाराविरोधात आहे. ते देशावर आक्रमण करत आहेत. देशात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. देशातली पूर्ण संपत्ती मोजक्या लोकांच्या हाती चालली आहे. यावर जेव्हा आम्ही चर्चा करत होतो. तेव्हा आम्ही स्वत:शी प्रश्न विचारला की, ही लढाई कुणाविरोधात आहे? तर ही लढाई विरोधक आणि भाजपाविरोधात नाहीये.”

हेही वाचा >> विरोधकांच्या INDIA ची पुढची बैठक मुंबईत, मल्लिकार्जुन खरगेंची घोषणा; म्हणाले, “२६ पक्ष एकत्र आल्याने पंतप्रधानांचे…”

“सध्या देशाचा आवाज चिरडला जात आहे. देशाच्या आवाजासाठी ही लढाई आहे. त्यामुळे इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स (Indian National Developmental Inclusive Alliance) म्हणजेच ‘INDIA’. ही लढाई एनडीए आणि INDIA मध्ये आहे. ही लढाई नरेंद्र मोदी आणि ‘इंडिया’मध्ये आहे. ही लढाई त्यांची विचारधारा आणि ‘इंडिया’मध्ये आहे. जो कुणी इंडियाच्या विरोधात उभा राहतो. तेव्हा विजय कुणाचा होतो, हे आपल्याला माहीत आहे. वेगळं सांगायची गरजही नाही,” असं राहुल गांधींनी नमूद केलं.

हेही वाचा- VIDEO : विरोधकांची बैठक संपल्यानंतर ममता बॅनर्जी कडाडल्या; म्हणाल्या, “हिंमत असेल तर ‘INDIA’ ला…”

“यानंतर आमची बैठक महाराष्ट्रात होईल. आम्ही सर्वांनी निर्णय घेतला आहे की, आम्ही एक ‘अॅक्शन प्लॅन’ (कृती आराखडा) तयार करू. सर्वजण एकत्र मिळून देशात आमच्या विचारधारेबाबत बोलू. तसेच देशासाठी आम्ही जे करू इच्छित आहोत, त्याबद्दल बोलू…” असंही राहुल गांधी म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul gandhi reaction after opposition leader meet in bangluru rmm
Show comments