Rahul Gandhi Reaction on Priyanaka Gandhi First Speech : केरळ लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा विजय मिळवत काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी आता थटे संसदेत पोहोचल्या आहेत. संसदेबाहेर प्रचारसभा गाजवणाऱ्या प्रियांका गांधी यांनी आता संसदही गाजवली. त्यांच्या संसदेतील पहिल्याच भाषणाची आज जोरदार चर्चा आहे. संसदेतील रखडलेल्या चर्चेच्या मुद्द्यावरून केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली.दरम्यान, त्यांच्या भाषणाचं राहुल गांधी यांनी तोंडभरून कौतुक केलंय.

पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत राहुल गांधी म्हणाले, “प्रियांका गांधींनी खूप चांगले भाषण केले. अप्रतिम भाषण दिलं. माझ्या पहिल्या भाषणापेक्षा चांगलं भाषण तिने केलं असं आपण म्हणुया.”

Rahul Gandhi Protest against modi shah
मोदी-अदाणीविरोधात काँग्रेस आक्रमक; राहुल गांधींच्या अनोख्य आंदोलनाने वेधले लक्ष
12 December Rashi Bhavishya In Marathi
दुसरा गुरुवार, १२ डिसेंबर पंचांग: महालक्ष्मीच्या कृपेने मेषला…
najma heptulla on indira gandhi emergency
Indira Gandhi: “इंदिरा गांधींना आणीबाणीचा पश्चात्ताप होत होता”, नजमा हेपतुल्ला यांचा आत्मचरित्रात दावा; विश्वासू व्यक्तींबाबतही होती तक्रार!
Sharad Pawar News
Uday Samant : “शरद पवारांचं इंडिया आघाडीबाबतचं ‘ते’ वक्तव्य म्हणजे काँग्रेसचा अपमान, राहुल गांधीचं नेतृत्व..” उदय सामंत काय म्हणाले?
Image of Vice-President Jagdeep Dhankhar or Rajya Sabha proceedings
No Confidence Motion : भारताच्या संसदीय इतिहासातील सर्वात मोठी घटना, राज्यसभा सभापतींच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव
ajit pawar rahul narvekar
Video: “जे आहे ते आहे, लाडक्या बहिणीनेच आम्हाला…”, अजित पवारांची विधानसभेत स्पष्टोक्ती!
What Devendra Fadnavis Said About Rahul Narwekar ?
Devendra Fadnavis : “राहुल नार्वेकर पुन्हा येईन म्हणाले नव्हते तरीही पुन्हा आले..”, देवेंद्र फडणवीस यांचं खुमासदार भाषण
Ramdas Athawale On Raj Thackeray
Ramdas Athawale : “मी असताना राज ठाकरेंची महायुतीत गरज काय?”, रामदास आठवलेंचं मोठं विधान

प्रियांका गांधी भाषणात काय म्हणाल्या?

देशातील राजकीय आणि सामाजिक स्थितीवर बोलताना आपल्या भाषणात प्रियांका गांधी म्हणाल्या की, आज जनतेला खरे बोलण्यापासून घाबरवले, धमकावले जात आहे. पत्रकार, विरोधी पक्षाचा नेता असो की एखाद्या विद्यापीठाचे प्राध्यापक, विद्यार्थी-कामगार संघटनांना गप्प बसवले जात आहे. कोणावर ईडी तर कोणावर सीबीआय यांच्या माध्यामातून खोट्या केसेस दाखल करून त्यांना तुरूंगात टाकले जाते. विरोधकांना तुरूंगात टाकून त्रास दिला जात आहे. या सरकारने कोणाला सोडले नाही. यांनी देशातील वातावरण भीतीने भरून टाकले आहे. यांची मिडियाची मशीन खोटी माहिती पसरवते आणि वेगवेगळे आरोप करते. पण कदाचित ती देखील भीतीखालीच जगत आहेत.”

हेही वाचा >> Priyanka Gandhi In Lok Sabha: खासदार प्रियांका गांधी यांचे लोकसभेत पहिलेच भाषण; संविधानाच्या मुद्द्यावर मोदी सरकारवर सडकून टीका

प्रियांका गांधींनी सत्ताधाऱ्यांमध्ये चर्चा करण्याची हिंमत नसल्याचा दावा केला आहे. देशातील परिस्थिती गंभीर असल्याचे सांगत त्या म्हणाल्या की, “मी आठवण करून देऊ इच्छिते की असे वातावरण देशात इंग्रजांच्या काळात होते. जेव्हा या बाजूला बसलेले गांधींच्या विचारधारेचे लोक स्वातंत्र्याची लढाई लढत होते आणि त्या बाजूच्या विचारधारेचे लोक भीतीमध्ये राहून इंग्रजांबरोबर हा‍तमिळवणी करत होते. पण भीतीचा देखील आपला एक स्वभाव असतो, भीती पसरवणारे देखील स्वत: भीतीचे लक्ष्य ठरतात. हा निसर्गाचा नियम आहे. हे भीती पसरवण्याची यांना इतकी सवय झाली आहे की तेच भीतीच्या सावटाखाली राहत आहेत. हे (सत्ताधारी) चर्चेला आणि टीकेला घाबरतात. आम्ही किती दिवसांनी चर्चा करण्याची मागणी करत आहोत, पण यांच्यात चर्चा करण्याची हिंमतच नाही”.

Story img Loader