काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो (Bharat Jodo Yatra) यात्रा देशभरात सुरु आहे. कन्याकुमारीपासून सुरू झालेला हा प्रवास दिल्लीपर्यंत पोहोचला आहे. भारत जोडो यात्रेत सर्वाधिक चर्चा रंगलीय ती म्हणजे राहुल गांधींच्या टी-शर्टची. वास्तविक, भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी टी-शर्ट वरच दिसत आहेत. राहुल गांधींनी टी-शर्ट घातलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दिल्लीच्या कडाक्याच्या थंडीतही राहुल गांधी फक्त टी-शर्टमध्ये दिसत आहेत. यावरून लोकांना प्रश्न पडलाय की, राहुल गांधींना थंडी वाजत नाहीये का? याबाबत राहुल गांधींना विचारले असता त्यांनी स्वतःच याचे भन्नाट उत्तर दिले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सध्या फक्त टी-शर्टच चालत आहे: राहुल गांधी

काँग्रेसच्या स्थापनादिनानिमित्त राहुल गांधी दिल्लीतील पक्ष कार्यालयात पोहोचले होते. स्थापना दिनानिमित्त पक्ष कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. राहुल गांधी तिथेही टी-शर्ट घालून आले होते. त्याचवेळी तिथे उपस्थित एका पत्रकाराने राहुल गांधींना टी-शर्टबाबत प्रश्न केला. यावर राहुल गांधींनी त्याला उत्तर दिले. राहुल गांधी म्हणाले “सध्या फक्त टी-शर्ट चालू आहे आणि जोपर्यंत हे टी-शर्ट चालेल तोपर्यंत चालवेन.

भारत जोडो यात्रेने सध्या ब्रेक घेतला आहे. भारत जोडो यात्रा २४ डिसेंबरला दिल्लीत पोहोचली होती. ३ जानेवारीला दिल्लीतील कश्मिरी गेट येथून यात्रेला पुन्हा सुरुवात होईल. मिळलेल्या वृत्तानुसार, फारुख अब्दुल्ला, उमर अब्दुल्ला आणि मेहबूबा मुफ्ती हे देखील जम्मू-काश्मीरच्या या भेटीत सहभागी होणार आहेत

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul gandhi replies to question about wearing tshirt in bharat jodo yatra delhi gps