Rahul Gandhi at Congress Constitution Day 2024 Event in delhi : देशभभरात आज (२६ नोव्हेंबर) ७५ वा संविधान दिन साजरा केला जात आहे. विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीतील वेगवेगळ्या पक्षांनी देशभरात संविधान दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. ठिकठिकाणी संविधान बचाओ रॅली काढण्यात आल्या. दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर काँग्रेसने मोठा कार्यक्रम आयोजित केला होता. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी या कार्यक्रमाला संबोधित केलं. मात्र, राहुल गांधी यांचं भाषण चालू असताना अचानक माइक बंद पडला. त्यानंतर काँग्रेसचे नेते व कार्यकर्ते गोंधळ घालू लागले. सभेच्या ठिकाणी लावलेला माइक बराच वेळ बंद होता. काही वेळाने माइक दुरुस्त करण्यात आला. त्यानंतर राहुल गांधी पुन्हा भाषण करायला उभे राहिले. यावेळी राहुल गांधी म्हणाले, “तुम्ही कितीही माइक बंद करा, मी बोलत राहणार. दलितांची, वंचितांची बाजू मांडत राहणार”.
राहुल गांधी म्हणाले, “तुम्ही माइक बंद केले तरी मी बोलणार, दलित, वंचितांसाठी आवाज उठवणार. जेव्हा कोणी दलितांसाठी, वंचितांसाठी आवाज उठवतो तेव्हा त्यांचा माइक असाच बंद केला जातो. त्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो. पण तुम्ही असे कितीही माइक बंद केले तरी मी मात्र बोलत राहणार. या कार्यक्रमात राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा जातीनिहाय जनगणनेची मागणी केली. तसेच ते म्हणाले, देशातील टॉप उद्योगपतींमध्ये एकही दलित, वंचित किंवा आदिवासी नाही. देश चालवणाऱ्या अधिकाऱ्यांमध्येही ओबीसी व दलितांचं प्रतिनिधित्व नाही.
हे ही वाचा >> आज-उद्या शपथविधी होणार नाही! राष्ट्रवादीने सांगितल्या पडद्यामागच्या घडामोडी; मुख्यमंत्रिपदाबाबत म्हणाले..
आम्ही तेलंगणात जातीनिहाय जनगणनेला सुरुवात केली आहे : राहुल गांधी
काँग्रेस खासदार म्हणाले, “तेलंगणात आमचं सरकार आलं आहे. त्यामुळे आम्ही तेलंगणात जातीनिहाय जनगणनेला सुरुवात केली आहे. यामध्ये लोकांना जे प्रश्न विचारले जातायत ते राज्यातील दलित, वंचित आणि गरिबांनी मिळून तयार केले आहेत. म्हणजेच तेलंगणात होणाऱ्या जातीनिहाय जनगणनेचं स्वरूप तिथल्या जनतेने, गोरगरिबांनी व दलितांनी तयार केलं आहे. हे एक ऐतिहासिक पाऊल आहे. जिथे-जिथे आमचं सरकार येईल तिथे तिथे आम्ही अशाच पद्धतीने जातीनिहाय जनगणना करणार आहोत”.
हे ही वाचा >> भाजपासमोर शिंदेंची माघार? मुख्यमंत्रिपदाबाबत केसरकरांनी मांडली शिवसेनेची भूमिका; म्हणाले, “शिंदेंनी राजीनामा देणं म्हणजे…”
राहुल गांधी सावरकरांचा उल्लेख करत म्हणाले…
स
राहुल गांधी म्हणाले, “संविधान हा अंहिसेचा मार्ग आहे. संविधान सत्य आणि अहिंसेचं पुस्तक आहे. संविधान हिंसेची परवानगी देत नाही. जिथे आमचं सरकार येईल. तिथे आम्ही अशा पद्धतीने (तेलंगणा) जातीनिहाय जनगणना करणार आहोत. वंचितांची हिस्सेदारी जास्त असेल तर त्यांची भागिदारी कमी का? मी खात्रीने सांगतो की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कधीच संविधान वाचलेलं नसेल. संविधान हे केवळ एक पुस्तक नाही, संविधान ही भारताची गेल्या हजारो वर्षांपासूनची विचारसरणी आहे. तो भारताचा विचार आणि आत्मा आहे. यात महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुद्ध, महात्मा फुलेंसारख्या लोकांचा आवाज आहे. परंतु, यात सावररकरांचा आवाज नाही.
© IE Online Media Services (P) Ltd