काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी म्हणतात की मध्यप्रदेशात काँग्रेसचीच सत्ता येणार, त्यांनी दिवसाढवळ्या उघड्या डोळ्यांनी दिवा स्वप्न पाहू नये असा खोचक सल्ला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी त्यांना दिला आहे. राहुल गांधी यांना स्वप्न पाहण्याचा पूर्ण अधिकार आहे. मात्र ते डोळे उघडे ठेवून स्वप्न पाहात आहेत असाही टोलाही अमित शाह यांनी लगावला. अमित शाह यांनी मध्यप्रदेशातील जबलपूर येथे सभा घेतली. त्याच सभेत त्यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला.

 

सध्या राहुल गांधी मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने तयारीला लागले आहेत. राफेल करार, बेरोजगारी, भ्रष्टाचार या मुद्द्यांवर सातत्याने भाष्य करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनिल अंबानींना राफेल करारात कसा फायदा करून दिला हेदेखील सांगत आहेत. अशात राहुल गांधी यांना भाजपा नेत्यांकडून जशास तसे उत्तरही दिले जाते आहे. आजही भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी राहुल गांधी सत्तेचे दिवा स्वप्न पाहात असल्याची टीका केली आहे.

Story img Loader