Rahul Gandhi Vs Arvind Kejriwal in Delhi Assembly Election : दिल्ली विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे. यादरम्यान काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी सोमवारी इंडिया आघाडीतील त्यांचा सहकारी पक्ष आपवर टीका केली आहे. राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आपचे नेते अरविंद केजरीवाल हे सारखेच असल्याचे सांगत दोघांवर खोटे आश्वासने देत असल्याच आरोप केला आहे. दरम्यान केजरीवाल यांनी राहुल गांधी यांना प्रत्युत्तर दिलं असून काँग्रेस वाचवण्यासाठी झगडत असलेले राहुल गांधी त्यांना शिव्या देत असल्याचे म्हटले आहे.

ईशान्य दिल्लीतील सीलमपूर येथे एका सभेला संबोधित करताना, राहुल गांधी यांनी देशव्यापी जातीनिहाय जनगणनेचा मुद्दा उपस्थित केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अरविंद केजरीवाल या दोघांकडूनही याबद्दल एक शब्दही बोलला गेला नसल्याचे राहूल गांधी यांनी यावेळी नमूद केले.

zara dar pornhub video income
Zara Dar: PhD सोडून पॉर्नहब निवडलं; आता अभ्यासाचे व्हिडीओ टाकून कमावते अधिक पैसे; कोण आहे जारा डार?
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
hasan mushrif ajit pawar (1)
“…तर अजित पवार धनंजय मुंडेंना सोडणार नाहीत”, हसन मुश्रीफांचं वक्तव्य
Abdul Sattar
Abdul Sattar : अब्दुल सत्तार यांची मोठी घोषणा; “निवडणुकीत जात आणि धर्म आणला जातो, त्यामुळे यापुढे….”
Amit Shah in BJP Shirdi Convention news in marathi
अग्रलेख : दबंग… दयावान?
Sharad Pawar and Amit Shah
Sharad Pawar : शरद पवारांचं अमित शाह यांना उत्तर, “१९७८ मध्ये मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो तेव्हा हे गृहस्थ…..”
Badlapur Crime News
Badlapur Crime : पत्नीवर बलात्कार करणाऱ्या मित्राची पतीने डोक्यात हातोडी घालून केली हत्या, बदलापूरमधली घटना
Live-In Registration Mandatory UCC Rules in Marathi
Live-In Registration Mandatory : लिव्ह-इन जोडप्यांनाही लग्नाप्रमाणे नोंदणी करावी लागणार! ‘आधार’ अनिवार्य, २६ जानेवारीपासून UCC चे नवे नियम लागू होण्याची शक्यता

“तुम्ही केजरीवालजी यांना विचारा की त्यांना मागासवर्गीयांसाठी आरक्षण आणि जातीनिहायजनगणना हवी आहे का? मी जेव्हा जातीनिहाय जनगणनेबद्दल बोलतो तेव्हा मला पंतप्रधान मोदी आणि केजरीवाल या दोघांकडून एकही शब्द ऐकायला मिळत नाही. केजरीवाल आणि पंतप्रधान मोदी यांच्यात फरक नाही. दोघेही खोटी आश्वासने देतात”, असे राहुल गांधी म्हणाले.

आप आणि काँग्रेस या दोन पक्षांनी २०२४ मध्ये झालेली लोकसभा निवडणूक एकत्र लढवली होती, मात्र या निवडणुकीत दोन्ही पक्षांना अपेक्षित यश मिळालं नाही. त्यानंतर या दोन्ही पक्षांमध्ये तणाव वाढला आहे. लोकसभा निवडणुकीत दोन्ही पक्षांना दिल्लीत एकही जागा जिंकता आली नव्हती.

राहुल गांधी नेमकं काय म्हणाले?

जाहीर सभेदरम्यान राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अरविंद केजरीवाल यांच्यावर आश्वासन देऊनही महागाई कमी करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप केले. तसेच भारतात गरीब अधिक गरीब आणि श्रीमंत अधिक श्रीमंत होत असल्याचेही राहुल गांधी म्हणाले.

“पंतप्रधान मोदी आणि केजरीवाल यांना मागासवर्गीय आणि अल्पसंख्यांकांना त्यांचा हक्क मिळावा असं वाटत नाही. ते जातनिहाय जनगणनेबाबत शांत आहेत”, असे राहुल गांधी म्हणाले. याबरोबरच त्यांनी काँग्रेस दिल्लीत सत्तेत आल्यानंतर आरक्षणाची मर्यादा वाढवेल असे आश्वासन देखील दिलं.

अमेरिकेत अदाणी यांच्यावर झालेल्या लाचखोरीच्या प्रकरणावर भाष्य न करणाऱ्या अरविंद केजरीवाल यांच्यावरही राहुल गांधी यांनी यावेळी टीका केली. राहुल गांधी म्हणाले की, “अरविंद केजरीवाल हे अदाणींबद्दल कधीतरी बोलले आहेत का? आम्हाला गरीब आणि अल्पसंख्याकांसाठी समानता आणि ‘भागीदारी’ हवी आहे. मी स्पष्टपणे सांगतो आहे की आम्ही देश एका उद्योगपतीला चालवू देणार नाही”.

राहुल गांधी यांनी केजरीवाल स्वच्छ दिल्ली प्रोपगंडा चालवत असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी राजधानी दिल्ली पॅरीससारखी बनवू असे आश्वासन दिले होते, मात्र त्याएवजी भ्रष्टाचार, प्रदूषण आणि महागाई वाढली असल्याचे राहुल गांधी म्हणाले. “शिला दीक्षित सरकार सत्तेवर असताना केजरीवाल म्हणाले होते की, मी स्वच्छ दिल्ली बनवेन. पण आता किती प्रदूषण वाढलं आहे. महागाई आणि भ्रष्टाचार गगनाला भिडला आहे. आम्ही सत्तेवर आल्यास भ्रष्टाचार दूर करू”, असं आश्वासन राहुल गांधी यांनी दिलं.

केजरीवाल यांच्यावर बनावट कल्याणकारी योजनांचे आश्वासन दिल्याचा आरोप केल्यानंतर काही दिवसांपूर्वी आपने इंडिया आघाडीमधून काँग्रेसला बाजूला करम्यासाठी इतर पक्षांबरोबर चर्चा करणार असल्याचे म्हटले होते. यातच तृणमूल काँग्रेस पक्ष आणि शिवसेना (ठाकरे) तसेच समाजवादी पक्षाने आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे दिल्लीत सध्यातरी काँग्रेस पक्ष एकटा पडला आहे.

हेही वाचा>> अब्दुल सत्तार यांची मोठी घोषणा; “निवडणुकीत जात आणि धर्म आणला जातो, त्यामुळे यापुढे….”

केजरावाल काय म्हणाले?

दरम्यान दिल्ली विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेला अरविंद केजरीवाल यांनी प्रत्युत्तर दिले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर त्यांनी एक पोस्ट केली आहे. “आज राहुल गांधी दिल्लीत आले, त्यांनी मला भरपूर शिव्या दिल्या. पण मी त्यावर भाष्य करणार नाही. त्यांचा लढा काँग्रेस वाचवण्याचा आहे, माझा लढा हा देश वाचवण्याचा आहे”, असे अरविंद केजरीवाल म्हणाले आहेत.

दिल्लीत ५ फेब्रुवारीला मतदान

दिल्लीत एकाच टप्प्यात ७० विधानसभा मतदारसंघात ५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. तर निवडणुकीचे निकाल ८ फेब्रुवारी रोजी जाहीर केले जातील. या निवडणुकीत आप विजय मिळवून विजयाची हॅट्रिक साधण्याच्या तयारीत आहे. दिल्लीत २०१५ पासून आप सत्तेत आहे. तर २७ वर्षांनंतर भाजपा राजधानीत विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे १९९८ ते २०१३ सत्तेत राहिलेल्या काँग्रेसला देखील या निवडणूक निकालांपासून अनेक अपेक्षा आहेत.

Story img Loader