केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी निराशाजनक आणि गोंधळात टाकणारं बजेट सादर केलं आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी दिली आहे. मोदी सरकारचा अर्थसंकल्प हा सरळसोट नाही तर गुंतागुंतीचा आहे असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. रोजगार निर्मिती आणि अर्थव्यवस्थेची घडी बसवण्याच्या अनुषंगाने हा अर्थसंकल्प सादर होईल असं वाटलं होतं. मात्र यंदाच्या अर्थसंकल्पात कोणतीही ठोस तरतूद करण्यात आलेली नाही असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेलं बजेट आणि त्या दरम्यान दिलेलं भाषण हे बजेटच्या इतिहासातील प्रदीर्घ भाषण होतं. मात्र ते अत्यंत पोकळ आश्वासनाचं भाषण होतं अशी टीका राहुल गांधींनी केली आहे. सध्या आपल्या देशात बेरोजगारीची सगळ्यात मोठी समस्या आहे. मात्र तरुणांच्या हाती काहीही लागलेलं नाही. या अर्थसंकल्पात ठोस म्हणावी अशी कोणतीही तरतूदच करण्यात आलेली नाही. त्यामुळे या सरकारची मानसिकता काय आहे? ते दाखवणाराच हा अर्थसंकल्प आहे असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

 

Story img Loader