आगामी लोकसभा निवडणुकांसाठी भाजपचे प्रचारप्रमुख नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी ज्या राजस्थानातून काँग्रेसवर चौफेर हल्ला चढविला त्याच राजस्थानात बुधवारी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी तुम्ही मर्यादा सोडा, आम्ही ती सोडणार नाही, असे बजावत भाजपवर निशाणा साधला.
आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारात भाजपकडून नरेंद्र मोदी यांना तर काँग्रेसकडून राहुल गांधी यांना पंतप्रधान म्हणून पुढे केले जाण्याचा तर्क आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांच्या कलगीतुऱ्याने बहुतांश प्रचार झाकोळण्याची चिन्हे उभय नेत्यांच्या राजस्थानच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचार दौऱ्यापासूनच दिसू लागली आहेत.
जंगी सभेत मोदी यांचे नाव न घेता राहुल गांधी म्हणाले, काल एका नेत्याने येऊन तुमची बरीच करमणूक आणि हसवणूक केली. आम्ही मात्र कोणाही विरुद्ध चुकीचे आणि हीन पातळीवरचे काहीच बोलणार नाही. विरोधक आमच्यावर शाब्दिक हल्ला चढवू शकतात, आम्हाला खिजवण्याचा प्रयत्न करू शकतात, आमची िनदानालस्ती करू शकतात. तो त्यांचा विशेषाधिकार आहे. ते आमची खिल्लीही उडवू शकतात. त्यांना त्यातून आनंद मिळवू द्या. या साऱ्यातून त्यांचा रागच बाहेर पडतो आहे, पण आम्ही त्यांची ही भेट स्वीकारणार नाही. त्यांनी कितीही खिजवले तरी आम्ही आमची पातळी सोडणार नाही. तुम्ही कितीही टीका करा, आम्ही बधणार नाही. कारण आम्ही काँग्रेसचे सैनिक आहोत. आम्ही देशासाठी झुंजत राहू, असेही ते म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा