हरियाणात जातीय वादातून करण्यात आलेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या जितेंद्र यांची काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी भेट घेतली. जितेंद्र हे दलित समाजातील असून काल पहाटे त्यांच्या कुटुंबावर गावातील उच्चवर्णीय समाजाकडून हल्ला करण्यात आला होता. यावेळी राजपूत समाजातील काहीजणांनी जितेंद्र कुटुंबासह घरात असताना त्यांचे घर बाहेरून पेटवून दिले होते. यामध्ये त्यांच्या दोन लहान मुलांचा मृत्यू झाला होता, तर त्यांची बायको आणि ते स्वत: जखमी झाले होते. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी आज जितेंद्र यांची भेट घेतली. यावेळी राहुल यांनी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांशी चर्चा करून हा सर्व वाद नेमका कशामुळे निर्माण झाला याची माहिती घेतली. यावेळी पत्रकारांनी राहुल यांना तुम्ही केवळ छायाचित्र काढण्याची संधी म्हणून याठिकाणी भेट दिलीत का, असा प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना राहुल गांधी आक्रमक झालेले दिसले. तुम्हाला ही केवळ छायाचित्र काढण्याची संधी आहे, असे म्हणायचे आहे का?, या देशात सर्वत्रच लोक मरत आहेत आणि तुम्हाला ही छायाचित्र काढण्याची संधी वाटते. हे वक्तव्य केवळ माझ्यासाठी नाही तर जे कुटूंब सध्या यातना भोगत आहे, त्यांच्यासाठी खूपच अपमानास्पद असल्याचे राहुल यांनी म्हटले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा