गुजरात निवडणुकीकडे सर्व देशाचं लक्ष लागलं होतं. गुजरात निवडणुकीत भाजपाने ऐतिहासिक विजय प्राप्त केला आहे. सलग सातव्यांदा भाजपा गुजरातमध्ये सत्ता स्थापन करत आहे. तर, काँग्रेसला सपाटून मार खावा लागला आहे. गुजरातमध्ये भाजपा १५८ जागांवर आघाडीवर आहे, तर काँग्रेसचे केवळ १६ च उमेदवार आघाडीवर असल्याचं दिसत आहे. गुजरातमधील पराभवानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे,
गुजरातमधील पराभव राहुल गांधी यांनी स्वीकारला आहे. ट्वीट करत राहुल गांधी म्हणाले, “गुजरातच्या जनतेचा जनादेश आम्ही नम्रपणे स्वीकारतो. देशाच्या आदर्शासाठी आणि गुजरातमधील जनतेच्या हक्कांसाठी आम्ही पुनर्बांधणी करु, पुन्हा कठोर परिश्रम करु आणि लढत राहू,” असं राहुल गांधींनी म्हटलं.
दरम्यान, मागील वेळी भाजपाला ९९ जागा मिळाल्या होत्या. तर, काँग्रेसला ७७ जागा मिळत भाजपा मोठी टक्कर दिली होती. यंदा काँग्रेस भाजपाविरुद्ध आक्रमकपणे उतरण्याची आशा होती. पण, ‘आप’ला मोठ्या प्रमाणात मते मिळाल्याने काँग्रेसचे मनसुबे उधळले आहेत.