देशात एकीकडे करोनाच संकट असताना दुसरीकडे इंधन दर गगनाला भिडत असल्याने, नागरिकांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावं लागत आहे. अनेक शहरांमध्ये तर पेट्रोलने शंभरी देखील ओलांडली आहे. तरी देखील इंधन कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेल दरवाढ सुरूच असल्याने सर्वसामान्य जनता त्रस्त झालेली आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांकडून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या मुद्यावरून मोदी सरकारला टोला लगावला आहे.

“ मोदी सरकारच्या विकासाची ही परिस्थिती आहे की, जर एखाद्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर वाढले नाही तर जास्त ती जास्त मोठी बातमी होते.” असं राहुल गांधी ट्वटिद्वार म्हणाले आहेत.

“पेट्रोल पंपावर गेल्यावर महागाईचा विकास दिसणार”; राहुल गांधींचा मोदी सरकारला टोला

या अगोदर देखील राहुल गांधी यांनी सातत्याने मोदी सरकारवर टीका केलेली आहे. “काही राज्यांमध्ये अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली आहे. पेट्रोल पंपावर बिल घेताना मोदी सरकारने केलेला महागाईचा विकास दिसणार आहे. कर वसुली, महामारीच्या लाटा येत आहेत”, असं ट्विट राहुल गांधींनी या आधी केलेलं आहे.

“कल्याणकारी योजनांसाठी आम्ही पैसे वाचवतोय”; पेट्रोलच्या वाढत्या किंमतीवर सरकारचा खुलासा!

तर, राहुल गांधींच्या टीकेला केंद्रीयमंत्री पेट्रोलियम धर्मेंद्र प्रधान यांनी काही दिवसांपूर्वी प्रत्युत्तर दिलेलं आहे. “राहुल गांधींनी अगोदर उत्तर द्यावं, त्यांचा पक्ष सत्तेत असलेल्या महाराष्ट्रात इंधन दरात वाढ का आहे? राजस्थान, पंजाबमध्ये का इंधन दर वाढ झालेली आहे? अशी बेजबाबदार वक्तव्य राहुल गांधींच करू शकतात. जर राहुल गांधींना गरिबांबद्दल एवढीच कळवळ चिंता आहे, तर त्यांनी आपले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आदेश द्यावा. आज मुंबईत सर्वात महाग पेट्रोल यामुळे आहे की महाराष्ट्राचा कर देशात सर्वात जास्त आहे. राजस्थानचा कर पेट्रोलवर सर्वात जास्त आहे.” असं धर्मेंद्र प्रधान यांनी माध्यमांशी बोलाताना बोलून दाखवलं आहे.

Story img Loader