Rahul Gandhi 12 Tughlak Lane Bungalow: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत केलेल्या एका वक्तव्यामुळे त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. सुरत न्यायालयानं त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर त्यांची खासदारकी रद्द झाली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांना आज त्यांचा बंगला सोडावा लागला. बंगला सोडताना राहुल गांधी म्हणाले की, खरं बोलण्याची किंमत मोजावीच लागेल, आणि मी ती मोजत राहीन.

राहुल त्यांचा बंगला सोडताना त्यांची बहीण आणि काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधीदेखील तिथे हजर होत्या. तसेच राहुल यांच्या आई सोनिया गांधी आणि राज्यसभा खासदार के. सी. वेणुगोपालही राहुल यांच्या निवासस्थानी पोहोचले होते.

राहुल गांधी बंगला रिकामा करताना भावूक झाल्याचं पाहायला मिळालं, त्यावेळी ते म्हणाले की, हे घर त्यांना देशातील जनतेने दिलं होतं. या घरात ते १९ वर्षांपासून राहत होते. परंतु केंद्र सरकारने त्यांच्याकडून हा बंगला हिसकावून घेतला आहे. तरीदेखील मी सरकारविरोधात खरं बोलणं सुरूच ठेवणार आहे.

काय म्हणाल्या प्रियांका गांधी?

राहुल गांधी यांनी १२ तुघलक लेन येथील सरकारी बंगला रिकामा केला आहे. आज त्यांनी संबंधित सरकारी अधिकाऱ्याला बंगल्याची चावी सुपूर्द केली. यावेळी त्यांच्यासोबत प्रियांका गांधी वाड्रादेखील होत्या.

हे ही वाचा >> “तानाजी सावंतांना शिक्षणमंत्री करणार होतो, पण…”, ठाणे रुग्णालयाच्या भूमिपूजनावेळी एकनाथ शिंदेंचं वक्तव्य, म्हणाले…

यावेळी माध्यमांशी बोलताना प्रियांका गांधी म्हणाल्या की, आम्ही या अशा कृत्यांना घाबरणार नाही आणि जनतेचे प्रश्न मांडतच राहू. राहुल सरकारबद्दल खरं बोलत आहेत, म्हणूनच त्यांच्यासोबत हे घडतंय. राहुल खूप हिंमतवान आहेत, ते कोणालाही घबरत नाहीत. न घाबरता ते त्यांचा संघर्ष सुरू ठेवतील.

Story img Loader