आज देशभर गांधी जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज अमृतसरच्या गोल्डन टेम्पलला भेट दिली. येथे त्यांनी गुरबानी किर्तन ऐकले तसंच, सामुदायिक सेवाही प्रदान केली.

गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी सातत्याने चर्चेत येत आहेत. कधी ट्रकमधून प्रवास तर कधी गॅरेजमध्ये भेट दिल्याचे त्यांचे फोटो बरेच व्हायरल झाले. भारत जोडो यात्रेमुळेही ते अनेकापर्यंत पोहोचले. दरम्यान, त्यांचा आजचा एक व्हिडीओही चर्चेचा विषय ठरला आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि देशातील सर्वात मोठ्या पक्षाचे माजी अध्यक्ष राहिलेले राहुल गांधी यांनी गोल्डन टेम्पलमध्ये जाऊन भांडी घासली आहेत.

Yatra of Yallama Devi begins in Jat
यल्लमा देवीच्या यात्रेस जतमध्ये प्रारंभ
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Dr. Manmohan Singh passes away at 92
Manmohan Sing Death : मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया, “माझे आदर्श आणि मार्गदर्शक..”
ishwar allah tero naam bhajan news
Protest on Bhajan: ‘ईश्वर अल्लाह तेरो नाम’ भजनावर आक्षेप घेत घोषणाबाजी; अटल बिहारी वाजपेयींच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित कार्यक्रमात गोंधळ!
Shegaon Gajanan Maharaj temple , Shegaon,
अवघी दुमदुमली संतनगरी! विदर्भ पंढरीत पाऊण लाख भाविकांची मंदियाळी…
mohan bhagwat in disputed religious land
Mohan Bhagwat: मोहन भागवतांच्या भूमिकेशी ‘दी ऑर्गनायझर’ची फारकत; म्हणे, “वादग्रस्त धार्मिक स्थळांचं सत्य समोर आलंच पाहिजे!”
minister Sanjay rathod
“मृद व जलसंधारण विभागात तीन हजार पदे भरणार”, मंत्री संजय राठोड यांची घोषणा; पालकमंत्रिपदाबाबत म्हणाले…
Maharashtrachi Hasya Jatra Fame Onkar Raut
“आपल्या सणांचे फोटो कधी टाकलेस…”, विचारणाऱ्या नेटकऱ्याला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याचं स्पष्ट उत्तर; म्हणाला…

डोक्यावर निळा स्कार्फ घालून राहुल गांधींनी सुवर्ण मंदिरात स्वयंसेवक सेवेचा भाग म्हणून त्यांनी भांडी घासली. एवढंच नव्हेतर, राहुल गांधी आज पंजाबमध्येच राहणार आहेत.

“श्री राहुल गांधी सचखंड श्री हरमंदिर साहिब येथे नमन करण्यासाठी अमृतसर साहिब येथे येत आहेत. ही त्यांची वैयक्तिक, आध्यात्मिक भेट आहे, त्यांच्या गोपनीयतेचा आदर करूया. या भेटीला सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहू नये ही विनंती. तुम्ही सर्वजण भावनेने तुमचा पाठिंबा दर्शवू शकता आणि पुढच्या वेळी त्यांना भेटू शकता”, असं पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष राजा वारिंग ट्वीट केलं होतं.

स्थानिक काँग्रेस नेते भगवंतपाल सिंग सच्चर यांनी सांगितले की, “राहुल गांधी चार्टर्ड विमानाने पंजाबमध्ये आले असू शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीद्वारे (एसजीपीसी) चालवल्या जाणार्‍या एका इन्समध्ये ते राहणार आहेत. याशिवाय, दरबार साहिबजवळील एका खाजगी हॉटेलमध्ये त्यांची एक खोली बुक केली आहे. राहुल गांधींसाठी एसजीपीसी इनमध्ये एकच खोली बुक केलेली असताना, त्यांच्या सुरक्षा कर्मचार्‍यांना आणखी खोल्यांची गरज भासू शकते, त्यामुळे खाजगी हॉटेलमध्ये पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे.” राहुल गांधींनी जानेवारी महिन्यात भारत जोडो यात्रेदरम्यानही दरबार साहिबला भेट दिली होती.

Story img Loader