पंतप्रधान नरेंद्र मोदी दररोज ओबीसी समाजाबद्दल बोलतात. पण, ओबीसी समाजाबद्दल पंतप्रधान मोदींनी काय केलं? असा सवाल काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे. देशात पाच टक्के ओबीसी समाज आहे, हे मान्य करू. पण, पाच टक्क्यांहून अधिक ओबीसी समाज असेल, तर तो किती आहे, हे कळलं पाहिजे. आणि मी एखादी गोष्ट ठरवली, तर केल्याशिवाय सोडत नाही, असा इशारा राहुल गांधी यांनी भाजपाला दिला आहे. ते दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

राहुल गांधी म्हणाले, “पंतप्रधान मोदी ओबीसी समाजासाठी खूप काही केल्याचं सांगतात. पंतप्रधान एवढं काम करतात, तर ९० मधील फक्त ३ सचिव ओबीसी समाजातून का आहेत? भारतातील ५ टक्के अर्थकारण ओबीसी समाजाच्या हातात आहे.”

Loksatta vyaktivedh Kaluram Dhodde leads Bhumise Adivasi Indira Gandhi
व्यक्तिवेध: काळूराम धोदडे
17th October Rashi Bhavishya In Marathi
१७ ऑक्टोबर पंचांग: धनसंपत्ती की प्रचंड यश, गुरुवारी…
rahul gandhi on nashik agniveer death
Rahul Gandhi : नाशिकमधील अग्निविरांच्या मृत्यूनंतर राहुल गांधींचे मोदी सरकारला तीन प्रश्न; म्हणाले…
Sharad Pawar criticism that such rulers have not been seen in the history of the maharshtra state pune print news
बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर शरद पवारांनी केली देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी; म्हणाले, “गृहमंत्री एवढ्या सौम्यतेने…”
sharad pawar, pm narendra modi
“पंतप्रधान मोदींच्या अगाध ज्ञानाचं…”; महात्मा गांधींबाबत केलेल्या ‘त्या’ विधानावरून शरद पवारांचा टोला!
Nitin Gadkari prime minister
Nitin Gadkari PM Offer : गांधी, पवार की ठाकरे, कोणत्या विरोधकांकडून होती पंतप्रधान पदाची ऑफर; नितीन गडकरी म्हणाले…
rahul gandhi criticized narendra modi
कंगना रणौत यांच्या माफीनाम्यानंतर राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींना इशारा; म्हणाले, “जर पुन्हा कृषी कायदे लागू करण्याचा प्रयत्न केला, तर…”
vijay wadettivar
Vijay Wadettiwar : “…मग ब्रिजभूषण सिंह यांचे एन्काऊंटर का केले नाही?”; अक्षय शिंदे मृत्यू प्रकरणावरून विजय वडेट्टीवारांचं पुन्हा शिंदे सरकारवर टीकास्र!

“पंतप्रधान दररोज ओबीसींबद्दल बोलतात. पण, ओबीसींसाठी काय केलं? हे बोलल्यावर पंतप्रधानांनी प्रतिक्रिया मजेशीर होती. ‘पंतप्रधान म्हणतात, लोकसभेत ओबीसी प्रतिनिधित्व करणारे आमची लोक आहेत.’ लोकसभेत प्रतिनिधित्व करण्याचा काय संबंध आहे? ५ टक्के ओबीसी समाज अर्थकारणाबाबत निर्णय घेत आहे. भारतात ओबीसी समाज फक्त ५ टक्के आहे का? याची माहिती आम्हाला पाहिजे.”

“भारतात ५ टक्के ओबीसी समाज आहे, हे मान्य करू. पण, पाच टक्क्यांहून अधिक ओबीसी समाज असेल, तर तो किती आहे, याची माहिती मिळाली पाहिजे. आणि मी एखादी गोष्ट ठरवली, तर ती केल्याशिवाय सोडत नाही,” असं राहुल गांधी यांनी म्हटलं.