संयुक्त अरब अमीरात (युएई) च्या दौऱ्यावर असलेल्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा विदेशातही डंका वाजलेला स्पष्टपणे दिसून येत होते. कारण, राहुल यांना ऐकण्यासाठी दुबईतल्या भारतीय समुदयाने तुफान गर्दी केली होती. एका भव्य स्टेडिअममध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


दुबईत संबोधित करताना राहुल गांधी यांनी भाजपावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, युएई आणि भारत इथल्या लोकांना एकत्र आणणारे मुल्य विनम्रता आणि सहिष्णूता आहे. मात्र, मला याचा खेद वाटतो की, भारतात गेल्या साडेचार वर्षात असहिष्णूतेत वाढ झाली आहे.


बेरोजगारीचा सर्वात मोठा प्रश्न सध्या भारतासमोर आ वासून उभा आहे. त्यासाठी यात सुधारणा करीत आगामी काळात आपल्याला संपूर्ण जगाला हे दाखवून द्यायला हवे की, आम्ही केवळ बेरोजगारीचा प्रश्नच सोडवू शकत नाही तर चीनला देखील आव्हान देऊ शकतो. परदेशात होणारा राहुल गांधींच्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यांप्रमाणे तुफान गर्दी जमली होती.

राहुल गांधी म्हणाले, आपल्या भारतासारख्या एका विशाल खंडप्राय देशाला केवळ एक आयडियाच ठीक आहे, यावर आपण पुढे जाऊ शकत नाही. आज आपल्या देशात राजकीय कारणांसाठी एकमेकांत फूट पाडण्याचा प्रयत्न कारण्यात येत आहे. यावेळी दुबईच्या शासकांचे उदाहरण देताना राहुल गांधी म्हणाले, युएईमध्ये यंदाचे वर्ष सहिष्णुतेचं वर्ष म्हणून पळाले गेले होते. मात्र, भारतात गेल्या साडेचार वर्षापासून सगळीकडे असहिष्णुतेचं वातावरण निर्माण झाले आहे.

यावेळी आंध्र प्रदेशातील लोकांच्या मागण्यांबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर त्यांनी सांगितले की, जर आम्ही सर्वसाधारण निवडणूक जिंकलो तर आंध्र प्रदेशाला त्वरीत विशेष राज्याचा दर्जा देण्यात येईल.