काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यात देशातील कोणतीही जबाबदारी पेलण्याची क्षमताच नाही, असा हल्ला आम आदमी पार्टीचे (आप) नेते कुमार विश्वास यांनी मंगळवारी पुन्हा एकदा चढविला.
दामिनी आणि गुडिया (बलात्काराचे खटले) यासारखे संवेदनक्षम प्रश्न आले तेव्हा ते परदेशात होते, त्यामुळे देशातील कोणतीही जबाबदारी स्वीकारण्यास ते सक्षम नाहीत, असे कुमार विश्वास म्हणाले. गंभीर प्रश्नांवर राहुल गांधी यांनी आवाज उठविल्याचे कधीही दिसले नाही. त्यामुळे देशाचा कारभार जनता त्यांच्या हाती सुपूर्द करू शकत नाही, असेही विश्वास म्हणाले.प्रियांका गांधी-वडेरा या अमेठीत राहुल गांधी यांचा प्रचार करणार असल्याबद्दल विचारले असता विश्वास म्हणाले की, प्रियांका या आपल्याही भगिनी आहेत, दामिनी आणि गुडिया प्रकरणात पोलिसांच्या लाठय़ा झेलणाऱ्याच्या पाठीशी त्या उभ्या राहतात की परदेशात राहणाऱ्या राहुल गांधी यांचे समर्थन करतात, ते पाहावे लागेल, असेही विश्वास म्हणाले.
आतापर्यंत १० लाख लोकांनी सदस्यत्व नोंदविले असल्याचा दावा आपने केला आहे.

Story img Loader