आगामी लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात तिसऱया आघाडीचेच सरकार येईल, असे भाकीत समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते शिवपाल सिंग यादव यांनी गुरुवारी केले.
ते म्हणाले, भारतीय जनता पक्षाने जरी पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांचे नाव जाहीर केले असले, तरी जातीयवादी शक्ती सत्तेपासून दूर राहतील, यासाठी समाजवादी पक्ष सर्वोतोपरी प्रयत्न करेल. जातीयवादी पक्षांना लोकसभेच्या निवडणुकीत यश मिळू नये, यासाठीही आम्ही प्रयत्न करू. कोणत्याही स्थितीत आम्ही उत्तर प्रदेशचा गुजरात होऊ देणार नाही, याचाही पुनरुच्चार त्यांनी केला.
जर राहुल गांधी यांना आपल्यावर हल्ला होण्याची भीती वाटत असेल, तर त्यांनी स्वतःसाठी लष्करी जवानांची सुरक्षा घ्यावी, अशीही टीका यादव यांनी केली.

Story img Loader