विरोधी पक्षातील नेते जनतेला फक्त खोटी आशा दाखवतात, त्यासाठी ते खोटय़ा बढाया मारतात. पण प्रत्यक्षात मात्र, असे पक्ष केवळ श्रीमंतांसाठीच काम करतात, असे सांगत काँग्रेस पक्ष मात्र केवळ गरिबांसाठीच काम करतो, असे प्रतिपादन काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी येथे बोलताना केले. आमचे राजकारण हे तुमच्या स्वप्नांचे राजकारण असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्यक्ष नाव न घेता राहुल यांनी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर शरसंधान केले.
शिक्षणाचा हक्क, अन्न सुरक्षेचा हक्क, भूसंपादनाचा हक्क, रोजगाराचा हक्क असे महत्त्वाचे हक्क आम्हीच जनतेला दिले, असा दावा राहुल गांधी यांनी केला. मोदींना लक्ष्य करताना, लोक येतात आणि उगाचच मोठमोठय़ा बतावण्या करतात, असा टोलाही त्यांनी हाणला.
काँग्रेस पक्षाचा बढाया मारण्याकडे कल नाही तर आमचा भर हा वचनांच्या पूर्ततेवर आहे, असेही गांधी यांनी सांगितले. जर आम्ही तुम्हाला स्वप्नेच पाहू दिली नाहीत तर, राष्ट्राची प्रगती कशी काय होणार, असा सवालही त्यांनी केला.
विरोधकांवरही राहुल यांनी सडकून टीका केली. जेव्हा गरिबांच्या योजनांचा सवाल येतो तेव्हा यांना पैसे कोठून येणार हा प्रश्न पडतो. पण जेव्हा खाणींची ठेकेदारी दिली जाते तेव्हा असे प्रश्न पडत नाहीत, असा आरोप त्यांनी भारतीय जनता पक्षावर केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा