काँग्रेसचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधानपदाच्या उमेदवारीपासून हात झटकले असले तरी काँग्रेस त्यांना सोडायला तयार नाही. आगामी सार्वत्रिक निवडणुका राहुल गांधी यांच्याच नेतृत्वाखाली लढविल्या जातील तसेच पंतप्रधानपदाच्या उमेदवारीसाठी आमच्या पक्षातर्फे त्यांनाच सर्वाधिक पसंती आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रवक्ता संदीप दीक्षित यांनी बुधवारी येथे केले.
आपल्याला पंतप्रधानपदामध्ये स्वारस्य नसून त्यावरून होणारी चर्चा अप्रस्तुत आहे, असे प्रतिपादन राहुल यांनी मंगळवारी स्वपक्षीय खासदारांशी बोलताना केले होते. या पाश्र्वभूमीवर दीक्षित यांना पत्रकारांनी छेडले असता त्यांनी काँग्रेस या बाबतच्या आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे संकेत दिले. या विषयीचा निर्णय घेण्याचा अधिकार पक्षश्रेष्ठी आणि आमच्या संसदीय समितीला आहे, निवडणुकीपूर्वी अशी घोषणा करणे आमच्या पक्षाच्या धोरणात बसत नाही, त्यामुळे योग्य वेळी याबाबत अधिकृत घोषणा केली जाईल, मात्र पंतप्रधानपदासाठीचे आमच्या पक्षाचे उमेदवार म्हणून राहुलच सर्वात योग्य आहेत, असे ते म्हणाले.
आगामी निवडणुका राहुल यांच्याच नेतृत्वाखाली लढल्या जातील, राहुल हे सध्या काँग्रेसच्या निवडणुकीतील डावपेचांची आखणी करत आहेत, असेही त्यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा