प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी फीट जेईई या खासगी कोचिंग संस्थेच्या भोपाळमधील प्लॅटिनम प्लाझा येथील कार्यालयावर आणि फ्रेंचाइचीवरही छापे घातल़े  संस्थेने आपला कारभार विस्तारण्याची योजना आखली आह़े  त्या अंतर्गत देशातील प्रमुख शहरामध्ये जागतिक दर्जाच्या चार शाळा सुरू करण्यात येणार आहेत़  त्या पाश्र्वभूमीवरच ही कारवाई झाल्याचे सूत्रांनी सांगितल़े
माहिती तंत्रज्ञान खात्याच्या तपास शाखेच्या २५ अधिकाऱ्यांनी केलेल्या या कारवाईत संस्थेचे आणि फ्रेंचाइसी असलेल्या मयूर स्कूलचे बँक खाते, ई- रेकॉर्ड सील केले आहेत़  अशा प्रकारचे छापे संस्थेच्या मुंबई, नवी दिल्ली, इंदूर, कोलकाता, कोटा, अहमदाबाद, पटाणा, गुरगाव आणि नोएडा येथेही घालण्यात येत आहेत.

Story img Loader