लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त ३१ ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. गुजरातच्या केवडियामध्येही या दिनानिमित्त परेड आयोजित करण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे याठिकाणी ‘रायगडा’ची प्रतिकृती साकारण्यात आल्याचं केंद्र सरकारकडून सांगण्यात आलं आहे. तसेच नागरिकांनी या ठिकाणी मोठ्या संख्येने भेट द्यावी, असं आवाहनही केंद्र सरकारकडून करण्यात आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गुजरातमध्ये ‘रायगडा’ची प्रतिकृती

“केंद्रीय गृहमंत्रालयाने एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. रायगड किल्ला हा मराठा स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे असामान्य शौर्य आणि अभिनव युद्धतंत्र दाखवण्यासाठी गुजरातच्या केवडियातील राष्ट्रीय एकता दिन परेडच्या ठिकाणी रायगड किल्ल्याची प्रतिकृती साकारण्यात आली आहे”, असं या पोस्टमध्ये सांगण्यात आलं आहे.

हेही वाचा – गड-किल्ले भ्रमंती; तुम्हाला माहितीये का दरवाजा नसलेला एकमेव किल्ला कोणता? जाणून घ्या रंजक इतिहास

याशिवाय “रायगड किल्ला हा महाराष्ट्राच्या वैभवशाली परपरेची आठवण करून देणारा आहे. त्याला किल्ल्यांचा राजा असं म्हटले जाते. जगभरातील शिवभक्तांसाठी हे एक पवित्र स्थळ आहे. त्यामुळे हजारो लोक येथे येतात. असंही या पोस्टमध्ये सांगण्यात आलं आहे. पुढे बोलताना नागरिकांनी ही प्रतिकृती बघण्यासाठी मोठ्या संख्येने भेट द्यावी”, असं आवाहनही केंद्र सरकारकडून करण्यात आलं आहे.

हेही वाचा – युनेस्कोच्या पथकाने का केली रायगड किल्ल्याची पाहणी? जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता मिळण्याची शक्यता किती?

राष्ट्रीय एकदा दिवस का साजरा केला जातो?

सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारताच्या स्वातंत्र्यानंतर संस्थानांचे एकत्रीकरण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे आज आपल्याला एकसंघ भारत बघायला मिळतो आहे. त्यांच्या प्रयत्नांचे स्मरण करण्यासाठी त्यांच्या जयंतीनिमित्त ३१ ऑक्टोबररोजी राष्ट्रीय एकता दिवस साजरा केला जातो. या दिवशी देशभरात विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच चर्चासत्र आयोजित केली जातात. याशिवाय या दिनानिमित्त दरवर्षी भारत सरकारकडून एक थीम निश्चित केली जाते. यावर्षी रायगड किल्ल्याची थीम आयोजित करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raigad fort theme for rashtriya ekta diwas 2024 celebrations at kevadiya gujarat spb