रेल्वेमंत्री पवन बन्सल यांचा भाचा विजय सिंग्ला याचा निकटवर्ती अजय गर्ग याने बुधवारी दिल्लीच्या न्यायालयात शरणागती पत्करल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. त्याला नऊ मेपर्यंत सीबीआयच्या कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. रेल्वेतील लाचखोरीप्रकरणी सीबीआयचे अधिकारी शोध घेत असल्याचे गर्ग याला प्रसारमाध्यमांतील बातम्यांवरून समजले. त्यानंतर त्याने न्यायालयासमोर शरणागती पत्करली. गर्ग याची जबानी घेण्यासाठी त्याला सीबीआयच्या कोठडीत ठेवण्याचे आदेश सीबीआयच्या विशेष न्या.स्वर्णकांता शर्मा यांनी दिले. गर्ग हा पंचकुला येथील रहिवासी आहे.
रेल्वे लाचखोरीप्रकरणी संशयित मध्यस्थास अटक
रेल्वेमंत्री पवन बन्सल यांचा भाचा विजय सिंग्ला याचा निकटवर्ती अजय गर्ग याने बुधवारी दिल्लीच्या न्यायालयात शरणागती पत्करल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. त्याला नऊ मेपर्यंत सीबीआयच्या कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
First published on: 08-05-2013 at 01:37 IST
TOPICSपवन बन्सल
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Railway bribery case alleged middleman arrested