रेल्वेतील उच्चपदस्थांच्या नियुक्तीसंदर्भात सुमारे १० कोटींची लाचबाजी झाल्याच्या आरोपप्रकरणी माजी रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांचा पुतण्या विजय सिंग याला व अन्य नऊ जणांविरोधात गुन्हेगारी कटकारस्थान तसेच भ्रष्टाचाराचे आरोप ठेवण्यात आले असून, तसे आरोपपत्र विशेष न्यायालयात दाखल करण्यात आले. हे सर्व जण सध्या अटकेत असून त्यांना आता खटल्यास सामोरे जावे लागेल.
भारतीय दंड विधानातील कलम १२०-ब (गुन्हेगारी कटकारस्थान) अन्वये या १० जणांविरोधात खटला दाखल करण्यास केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाच्या विशेष न्यायालयाच्या न्यायाधीश स्वर्णकांता शर्मा यांनी अनुमती दिली. नंतर या सर्वानी आपण दोषी नसल्याचा दावा केला.
या घटनेमुळे बन्सल यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
रेल्वे घोटाळा : बन्सल यांच्या पुतण्याविरोधात आरोपपत्र दाखल
रेल्वेतील उच्चपदस्थांच्या नियुक्तीसंदर्भात सुमारे १० कोटींची लाचबाजी झाल्याच्या आरोपप्रकरणी माजी रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांचा पुतण्या विजय सिंग
First published on: 12-03-2014 at 01:14 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Railway bribery scam charges framed against pawan bansals nephew ex rail minister likely to be summoned