रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांनी २०१३-१४ आर्थिक वर्षासाठीच्या रेल्वे अर्थसंकल्पात थेटपणे कोणतीही भाडेवाढ केलेली नसली, तरी सुपरफास्ट गाड्यांच्या इतर दरांमध्ये वाढ केल्यामुळे त्याचा चटका प्रवाशांना सहन करावा लागणार आहे.
सुपरफास्ट गाड्यांच्या पूरक शुल्क, आरक्षण शुल्क, लिपिक शुल्क, रद्द करण्याचे शुल्क आणि तात्काळ शुल्क इत्यादींमध्ये वाढ करण्यात आल्याने सुपरफास्ट गाड्यांच्या प्रवास महागणार आहे. अनेक प्रवासी लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी सुपरफास्ट गाड्यांचा वापर करीत असल्यामुळे त्यांना इतर शुल्कातील वाढीमुळे पुढील आर्थिक वर्षापासून एकूण तिकिटाची रक्कम जास्त द्यावी लागेल.

Story img Loader