मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशभरात मोठ्या प्रमाणात कोळशाचा तुटवडा जाणवत आहे. ऐन उन्हाळ्यात विजेची मागणी वाढल्याने वीज निर्मिती केंद्रांमध्ये कोळशाचा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी देशात अनेक ठिकाणी भारनियमनचा पर्याय अवलंबविला जात आहे. पण यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय उद्योग व्यवसायांना देखील मोठा आर्थिक फटका बसत आहे.

विजेच्या मागणीत झालेल्या प्रचंड वाढीमुळे कोळशाची वाहतूक करणाऱ्या रेल्वेगाड्यांच्या फेऱ्या वाढवल्या आहेत. पण याचा परिणाम आता प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या रेल्वेगाड्यांवर होत आहे. गेल्या काही आठवड्यांत दररोज सुमारे १६ मेल/एक्स्प्रेस आणि पॅसेंजर गाड्या रद्द कराव्या लागल्या आहेत. देशभरातील वीज निर्मिती केंद्रांमध्ये कोळसा वाहतूक करण्यासाठी एकाच मार्गावर ज्यादा गाड्या चालवाव्या लागत आहेत. रेल्वे मंत्रालयाने २४ मे पर्यंत पॅसेंजर गाड्यांच्या जवळपास ६७० फेऱ्या रद्द करण्याची अधिसूचना दिली आहे. यामध्ये ५०० हून अधिक फेऱ्या लांब पल्ल्याच्या मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांच्या आहेत.

Uttar Pradesh News Denied petrol
Uttar Pradesh : हेल्मेट न घातल्याने पेट्रोल नाकारले, संतप्त लाइनमनने थेट पेट्रोल पंपाची वीजच खंडीत केली; प्रशासने दिले चौकशीचे आदेश
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Central government opposes increase in power generation in Deonar Mumbai print news
देवनारमध्ये वीजनिर्मिती वाढीस केंद्राचा विरोध; प्रकल्प मंजुरीनंतर वीजनिर्मिती क्षमता वाढवणे नियमबाह्य असल्याचा अभिप्राय
buldhana Makar Sankranti nylon manja disrupted electricity in Nandura city
बुलढाणा : नायलॉन मांजामुळे वीज पुरवठा खंडित; विद्युत तारा तुटल्या, १५ ते २० मीटर जळाले…
Chandrapur, bribe, police sub-inspector,
चंद्रपूर : ५० हजाराची लाच, पोलीस उपनिरीक्षक प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात
khasdar krida mahotsav, Yashwant Stadium,
नितीन गडकरी म्हणाले, “नागपुरात एक लाख कोटींची कामे केली, पण…”
445 Anganwadis in Shahapur taluka in darkness due to lack of electricity connection
शहापूर तालुक्यातील ४४५ अंगणवाड्या वीज जोडणी अभावी अंधारात
electricity cost hike
वीजदरवाढ तूर्तास टळली, ‘डीसल्फरायझेशन’ची सक्ती दोन वर्षे लांबणीवर गेल्याने दिलासा

यासोबत रेल्वेनं कोळसा लोडिंगचं प्रमाण देखील वाढवलं आहे. देशात दररोज ४०० हून अधिक गाड्या लोड केल्या जात आहेत. हा आकडा मागील पाच वर्षाच्या तुलनेत सर्वाधिक आहे. सध्याची गरज लक्षात घेता नॅशनल ट्रान्सपोर्टरने दिवसाला ४१५ गाड्या लोड करण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. ज्यामध्ये प्रत्येकी साडेतीन हजार टन कोळसा वाहतूक केली जाणार आहे. पुढील जवळपास दोन महिने अशाच पद्धतीने कोळसा पुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे देशभरातील पॉवर प्लांट्समध्ये मुबलक प्रमाणात कोळसा उपलब्ध होईल.

कारण जुलै आणि ऑगस्ट महिन्यात कोळसा उत्खननावर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. पावसाचं पाणी कोळसा खाणीत शिरल्याने उत्खनन करण्यात अनेक अडचणी येतात. हा धोका लक्षात घेऊन भविष्यातील संघर्ष टाळण्यासाठी कोळसा वाहतुकीच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. यामुळे रेल्वे मंत्रालयाने २४ मे पर्यंत पॅसेंजर गाड्यांच्या जवळपास ६७० फेऱ्या रद्द करण्याची अधिसूचना दिली आहे. याचा प्रवाशांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत आहे. पण या तात्पुरत्या संकटावर लवकरच मात करू, असा विश्वास रेल्वे मंत्रालयाकडून व्यक्त केला आहे.

Story img Loader