ओडिशातील बालासोर येथील रेल्वे अपघाताला सिग्नल यंत्रणेतील दोष कारणीभूत ठरल्याची चर्चा सुरू आहे. अशातच सीबीआयने या अपघातप्रकरणी सोमवारी (१९ जून) रेल्वेच्या सिग्नल यंत्रणा विभागातील सोरो सेक्शन सिग्नल जुनियर इंजीनियरचं घर सील केलं. विशेष म्हणजे हा इंजीनियर सीबीआय चौकशीनंतर कुटुंबासह बेपत्ता असल्याचंही वृत्त प्रसिद्ध झालं. आता यावर रेल्वे विभागाने स्पष्टीकरण देत भूमिका स्पष्ट केली.

रेल्वे अधिकारी आदित्य कुमार चौधरी म्हणाले, “बहानगा रेल्वे स्टेशनचे कर्मचारी बेपत्ता असल्याचं वृत्त माध्यमांमध्ये आलं आहे. मात्र, हे खरं नाही. या स्टेशनचे सर्व कर्मचारी हजर आहेत आणि ते तपासात सहभागी होत आहेत. ते सीबीआयच्या चौकशीसाठी हजर होत आहेत.”

Pune Municipal Corporation construction department issued notices to 125 construction projects in the city and stopped work Pune print news
पुणे: बांधकाम बंद ठेवण्याच्या नोटिशींचा ‘फार्स’ ?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Navy speed boat, Boat accident Mumbai ,
विश्लेषण : भारताचे ‘टायटॅनिक’! ७७ वर्षांपूर्वी मुंबईजवळ रामदास दुर्घटना कशी घडली? किती भीषण? अजूनही बोट सुरक्षा वाऱ्यावर का?
Two arrested in Solapur for vandalizing ST bus
एसटी बसची नासधूस; सोलापुरात दोघांना अटक
Neelkamal Boat Accident, Maritime Board Officials ,
‘मेरिटाईमच्या कामकाजाची उच्चस्तरीय चौकशी करावी’
Narendra Bhondekar, Narendra Bhondekar Bhandara ,
फडणवीसांचाच प्रस्ताव स्वीकारायला हवा होता… शपथविधीनंतर शिंदेंच्या आमदाराकडून उघड…
Police suicide Nagpur, Nagpur suicide, Police suicide,
आठ दिवसांपूर्वी बेपत्ता, अखेर मृतदेहच हाती लागला; ‘त्या’ पोलिसाच्या आत्महत्येचे गुढ…
ST Bus , accidents ST Bus, Regulations ST Bus,
एसटीचे अपघात रोखण्यासाठी नियमावली? परिणाम पडणार का?

ओडिशा रेल्वे अपघातातील मृतांची संख्या २९२ वर

दरम्यान, ओडिशातील बालासोर येथील रेल्वे अपघातातील मृतांची संख्या आता २९२ वर पोहचली आहे. रविवारी (१९ जून) पश्चिम बंगालमधील २४ वर्षीय गंभीर जखमी प्रवाशाचा उपचार सुरू असतानाच मृत्यू झाला. अपघात घडला तेव्हा २८७ प्रवाशांचा घटनास्थळावरच मृत्यू झाला होता. यानंतर पाच प्रवाशांचा गंभीर जखमी झाल्याने रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. याशिवाय १२०८ प्रवासी जखमी झाले आहेत.

हेही वाचा : रेल्वे यंत्रणेत छेडछाड केल्यानेच ओडिशातील भीषण अपघात, अधिकाऱ्यांचा दावा, म्हणाले, “सीबीआय…”

सीबीआयकडून रेल्वे अपघाताचा तपास

सीबीआयने ६ जून रोजी बालासोर रेल्वे अपघाताच्या प्रकरणाचा तपास आपल्याकडे घेतला. या प्रकरणी एफआयआरही दाखल करण्यात आली आहे. अपघातानंतर सिग्नल यंत्रणेशी छेडछाड झाल्याचा आरोप झाल्यानंतर सीबीआयकडे तपास गेला. सीबीआयने तपास सुरू केल्यानंतर रेल्वे स्टेशनही सील करण्यात आलं. सिग्नल यंत्रणेशी संबंधित इंटरलॉकिंग पॅनलही सील करण्यात आला. तसेच पुढील सूचना येईपर्यंत कोणतीही ट्रेन बहानगा बाजार रेल्वे स्टेशनवर थांबवली जाणार नाही.

Story img Loader