जनता दलाचे प्रमुख आणि माजी रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव यांनी रेल्वेच्या भाडेवाढीसंदर्भात केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. आपण रेल्वेमंत्रिपद सोडल्यानंतर रेल्वे जणू रुळावरून खाली उतरली आहे. रेल्वे ही सामान्यांची जीवनरेखा समजली जाते, परंतु ही जीवनरेखाच नष्ट करण्याचे काम सत्ताधारी करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
रेल्वेचा महसूल वाढविण्यासाठी प्रवाशांवर आर्थिक बोजा टाकणे योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
महसूल वाढण्यासाठी आपण मालवाहतुकीला प्राधान्य दिले. केंद्र सरकारने रेल्वे प्रवासी भाडय़ात केलेली वाढ त्वरित मागे घ्यावी, अशी मागणीही लालू प्रसाद यांनी केली आहे.

Story img Loader