केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची ‘योगनिद्रा’ सध्या सोशल प्रसारमाध्यमांवर चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे. सुरेश प्रभू यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी कोची येथील एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी शवासन करताना सुरेश प्रभू बराच वेळ झाला तरी त्या अवस्थेतून बाहेरच आले नव्हते. त्यांच्या आजूबाजूला योगा करणारे इतर लोक शवासनाच्या मुद्रेतून बाहेर येऊन उठून बसले तरी प्रभू मात्र झोपूनच राहिले होते. बराच वेळ झाला तरी प्रभू उठत नाहीत हे पाहून अखेर योगा शिकवणाऱ्यांपैकी एका कार्यकर्त्याने प्रभूंना हलवले. त्यानंतर प्रभू खडबडून जागे झाले आणि सावरून आपल्या जागेवर बसले. मात्र, रेल्वेमंत्र्यांना लागलेल्या या गाढ झोपेची छायाचित्रे काही लोकांनी सोशल मीडियावर शेअर केली. त्यानंतर दक्षिण भारतातील अनेक वृत्तपत्रांमध्ये ही छायाचित्रे छापण्यात आलr आहेत. या प्रकाराचा एका स्थानिक वृत्तवाहिनीतर्फे प्रसारित करण्यात आलेला व्हिडिओही सोशल प्रसारमाध्यमांवर चांगलाच व्हायरल झाला आहे.

Story img Loader