जवळपास १०० किलोमीटर प्रतितास वेगाने धावणाऱ्या रेल्वेच्या आत्पातकालिन खिडकीतून एक आठ वर्षांची चिमुकली बाहेर पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात ती जखमी झाल्याची माहिती असून रेल्वे पोलिसांनी तिला १६ किलोमीटर दूर जंगलातून रेस्कू केलं उत्तर प्रदेशच्या ललितपूरमध्ये ही घटना घडली आहे. या घटनेनंतर आता रेल्वेच्या आत्पातकालिन खिडकीच्या सुरक्षेबाबत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
नेमकं काय घडलं?
हिंदुस्थान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, मथुरा येथील अरविंद तिवारी हे मध्यप्रदेशमध्ये एका नातेवाईकाच्या घरी जात होते. त्यांच्याबरोबर त्यांची पत्नी आणि आठ वर्षांची मुलगी होती. मुलगी ही रेल्वेच्या आत्पातकालिन खिडकीजवळ बसली होती. ज्यावेळी रेल्वे एका वळणावर पोहचली, तेव्हा मुलीने खिडकीतून डोकावून बघितलं. त्यात तिचा तोल गेल्या ती बाहेर पडली.
१५ किलोमीटर दूर जंगलात जखमी अवस्थेत आढळून मुलगी
दरम्यान, रेल्वे घटनास्थळावरून १०-१५ किलोमीटर पुढे गेल्यानंतरमुलगी तिच्या जागेवर नसल्याने तिच्या वडिलांच्या लक्षात आलं. सुरुवातीला त्यांनी रेल्वेत शोधाशोध केली. मात्र, ती न सापडल्याने खिडकीतून पडली असावी, असा संशय त्यांच्या मनात आला. त्यांनी साखळी ओढून रेल्वे थांबवण्याचा प्रयत्न केला. तसेच याची माहिती रेल्वे पोलिसांना देण्यात आली. रेल्वे पोलिसांनी आणि तिच्या पालकांनी रात्रीच्या अंधारात रेल्वेच्या मार्गाने शोध घेतला असता, त्यांना १५ किलोमीटर दूर जंगलात ती जखमी अवस्थेत आढळून आली.
मुलीचा पाय फ्रॅक्चर
रेल्वे पोलिसांनी मालगाडी थांबवत तिला ललितपूर रेल्वे स्थानकांत आणले. याठिकाणी तिच्यावर प्राथमिक केले. त्यानंतर तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार मुलीच्या पाय फ्रॅक्चर झाला असून उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.