आर्थिकदृष्टय़ा मागासवर्गात समावेश व्हावा यासाठी गेल्या आठवडाभरापासून हरयाणात सुरू असलेल्या जाट आंदोलनाने शनिवारी अधिक उग्र रूप धारण केले. आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात रोहतकमध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे तर ६१ जण जखमी झाले आहेत. तब्बल २३ जणांना पोलिसांच्या गोळ्या लागल्या आहेत. तरीही आंदोलकांनी आंदोलनाची धार कमी झालेली नाही. आंदोलकांनी आज जिल्ह्यातील बुधा खेरा रेल्वे स्थानक आंदोलनकर्त्यांनी जाळून टाकले . हरियाणातील सहा जिल्ह्यात लष्काराला पाचारण करण्यात आले असून, त्यांनी शहरातून संचलन केले. रोहतक, जिंद, झझ्झर, भिवानी, हिस्सार, कैथल, पानिपत, सोनिपत आणि कर्नाल या नऊ जिल्ह्यांत लष्कराला पाचारण करण्यात आले असून दिसताक्षणीच गोळ्या घालण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. याशिवाय केंद्रीय निमलष्करी दलांच्या वीस कंपन्यांची (सुमारे दोन हजार जवान) मागणी केंद्राकडे करण्यात आली आहे. पोलिसांच्या गोळीबारात एक जण ठार व २५ जण जखमी झाले. दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रोहतक आणि भिवानीमध्ये संचारबंदी लागू करण्यात आल्याची माहिती हरियाणाच्या पोलीस महासंचलकांनी दिली. दरम्यान, या आंदोलनामुळे अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या असून त्यामुळे रेल्वेला २०० कोटींची फटका बसला आहे.

Story img Loader