Cement Blocks on Railway Tracks: सर्वसामान्यांना भारतीय रेल्वे प्रवासासाठी सर्वात स्वस्त साधन मानली जाते. देशातील लाखो लोक दररोज रेल्वेने प्रवास करतात. मात्र, गेल्या काही महिन्यांत रेल्वे अपघाताच्या काही घटना घडल्या आहेत. त्यामुळे अनेकदा चिंताही व्यक्त करण्यात येते. अशातच सोमवारी कानपूरजवळ रेल्वे रुळावर एलपीजी सिलिंडर आणि पेट्रोलची बाटली आढळून आल्यामुळे खळबळ उडाली होती. मात्र, वेळीच कालिंदी एक्स्प्रेस थांबल्यामुळे पुढील अनर्थ टळला. या घटनेनंतर आता राजस्थानच्या अजमेर जिल्ह्यातून एक धक्कादायक घडना समोर आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अजमेर जिल्ह्यात वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोरच्या रुळांवर दोन सिमेंट ब्लॉक टाकून मालवाहू गाडी रुळावरून उतरवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यासंदर्भातील वृत्त फ्री प्रेस जर्नलने दिलं आहे. ही मालगाडी सिमेंटच्या ब्लॉकला धडकली. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. ज्या सिमेंटच्या ब्लॉकला मालवाहू गाडी धडकली त्या ब्लॉकचं वजन तब्बल ७० किलोच्या आसपास होत, असं सांगण्यात येत आहे.

हेही वाचा : कालिंदी एक्स्प्रेसच्या घातपाताचा प्रयत्न; रेल्वे रुळांवर एलपीजी सिलिंडर, पेट्रोलची बाटली, काडेपेटी; मोठा अपघात टळला

या घटनेबाबत एका अधिकाऱ्यांनी माहिती देताना सांगितलं की, या घटनेची माहिती बांगर गावच्या स्टेशन अधीक्षकांनी साडेदहा वाजता माहिती दिली होती. त्यानंतर रेल्वे ट्रॅकची तपासणी करण्यात आली. या तपासणीत १ किलोमीटरच्या परिसरात दोन ठिकाणी सिमेंटचे ब्लॉक सापडले आहेत. हे सिमेंटचे ब्लॉक इंजिनच्या धडकेमुळे तुटले आहेत. रविवारी रात्री ही मालगाडी फुलेराहून अहमदाबादकडे जात होती. यावेळी रेल्वे ट्रॅकवर असलेल्या अज्ञातांनी सारधना आणि बांगर रेल्वे स्थानकादरम्यान रुळावर सिमेंटचे ब्लॉक टाकून ट्रेन रुळावरून उतरवण्याचा कट रचलाल्याचा संशय आहे. या प्रकरणी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कालिंदी एक्स्प्रेसच्या घातपाताचा प्रयत्न

रेल्वे रुळांवर एलपीजी सिलिंडर ठेवल्याची घटना समोर आली होती. मात्र, कालिंदी एक्स्प्रेस वेळीच थांबल्यामुळे हा अपघात टळला. त्यामुळे एक्स्प्रेस उडवून देण्याचा संशय व्यक्त केला जात गेला. कानपूरजवळ ही घटना घडली सोमवारी घडली. या घटनेनंतर रेल्वेने अज्ञात व्यक्तींविरुद्ध शिवराजपूर येथे भारतीय न्याय संहिता, विस्फोटके कायदा आणि रेल्वे कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली होती.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Railway tracks cement blocks an attempt was made to derail a freight train by throwing cement blocks on the railway track in ajmer district of rajasthan gkt