मुसळधार पावसामुळे इराकच्या अनेक भागांत हाहाकार माजला असून बगदादमधील अनेक ठिकाणी कमरेभर उंचीइतके पाणी तुंबल्याने विस्थापितांच्या छावण्यांना त्याचा फटका बसला आहे.
बगदादमधील पायाभूत सुविधांच्या खराब अवस्थेमुळे इतक्या मोठय़ा प्रमाणावर पूरस्थिती ओढवली आहे. पुरामुळे झालेल्या अवस्थेची छायाचित्रे समाजमाध्यमांवर सातत्याने प्रसारित करण्यात येत असून त्यामुळे स्थिती किती भीषण आहे त्याची कल्पना येत आहे. या स्थितीमुळे चाकरमान्यांना कार्यालयात जाणे अशक्य झाल्याने सरकाला गुरुवारी सुटी जाहीर करणे भाग पडले आहे. बगदादमधील एका हॉस्पिटलमधील कर्मचारी गुडघ्याइतक्या उंचीच्या पाण्यातून वाट काढताना एका छायाचित्रात दिसत आहे. काही नागरिकांना, गटाराचे पाणी पिण्याच्या पाण्यात मिसळल्याने निराळ्याच समस्येला तोंड द्यावे लागत आहे.

Story img Loader