लेहभागात तापमान गोठणिबदूच्या खाली
जम्मू-काश्मीरमध्ये लडाखमधील लेह भागात तापमान गोठणिबदूच्या खाली म्हणजे उणे ४.२ अंश सेल्सिअस इतके झाले आहे. गुलमर्ग व पहलगाम येथे हिमवृष्टीही झाली. दरम्यान, उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिल्हय़ाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की हिमकडे कोसळण्याची शक्यता असून रात्रीच्या वेळी कुणीही तेथे जाऊ नये असा इशारा दिला आहे. जिल्हा प्रशासनाने करनाह ते कुपवाडा, केरण ते कुपवाडा, मच्छिल ते कुपवाडा या मार्गावर वाहतुकीस मनाई केली आहे. हवामानात बदल होईपर्यंत ही बंधने अमलात राहतील असे सांगण्यात आले. लेहचे किमान तापमान उणे ४.२ अंश सेल्सिअस होते व काल रात्री ते उणे १.५ अंश सेल्सिअस होते असे हवामान विभागाने म्हटले आहे. कारगिल शहरात किमान तापमान थोडे जास्त म्हणजे उणे २ अंश सेल्सिअस होते. आता ते ०.६ अंश सेल्सिअस झाले आहे. गुलमर्ग येथे नव्याने हिमवृष्टी झाली असून तेथे ४ इंच हिमवृष्टी झाली आहे. पावसाचे प्रमाण रात्री ५.६ मि.मी. होते. रात्रीचे किमान तापमान उणे ३ अंश सेल्सिअस होते. पहलगाम येथे हंगामातील पहिली हिमवृष्टी झाली. तेथे ७.४ मि.मी पाऊस झाला आहे. दक्षिण काश्मीरमध्ये तापमान ०.२ अंश सेल्सिअस होते. उन्हाळी राजधानी असलेल्या श्रीनगर येथे रात्रीचे तापमान ४.३ अंश सेल्सिअस होते ते त्याच्या एक रात्र अगोदर ६.७ अंश सेल्सिअस होते. रात्री काश्मीर खोऱ्यात पाऊसही होत असून, तापमानही अनेक ठिकाणी घसरले आहे. उंचीवर हिमवृष्टी तर इतर पठारी भागात पाऊस होईल असे हवामान खात्याने म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा