छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये आयोजित करण्यात आलेली धर्मसंसद वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. महाराष्ट्राचे कालीचरण महाराज यांनी मंचावरून महात्मा गांधींविरोधात वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या वक्तव्यावरुन अनेकांकडून विरोध करण्यात येत आहे. मात्र गौ-सेवा आयोगाचे अध्यक्ष आणि दूधाधारी मठाचे महंत रामसुंदर दास यांनी महात्मा गांधींवरील वक्तव्यावर प्रचंड नाराजी व्यक्त केली.  धर्म संसद आपल्या उद्देशापासून भरकटली आहे. मंचाच्या प्रतिष्ठेला कलंक लागला आहे. महापुरुषांना शिव्या दिल्या जात आहेत, असे रामसुंदर यांनी म्हटले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महंत रामसुंदर दास यांनी मंचावरून आयोजकांना फटकारले. त्यांनी त्याच वेळी धर्म संसदेवरही बहिष्कार टाकला. महात्मा गांधींवरील टीकेनंतर कालीचरण महाराज यांनी मंचावरून गोडसेला नतमस्तक केले होते. राजकारणातून राष्ट्र काबीज करणे हे इस्लामचे ध्येय आहे. १९४७ मध्ये इराण, इराक या दोघांवर आपल्या डोळ्यासमोर ताब्यात घेतले. अफगाणिस्तान आधीच ताब्यात होता. राजकारणाने आपण पाकिस्तान आणि बांगलादेश काबीज केले. कालीचरण महाराजांच्या वक्तव्याचा निषेध करत अनेक महंतांनी धर्म संसदेवर बहिष्कार टाकला.

VIDEO : “…म्हणून माझ्या मनात गांधींबद्दल तिरस्कार”; गुन्हा दाखल झाल्यानंतर कालीचरण महाराजांचं स्पष्टीकरण

महात्मा गांधींबद्दल अपमानास्पद शब्द वापरल्याने महंत राम सुंदर दास मंचावर आले. “मला तुम्हा सर्वांना विचारायचे आहे की या धर्म संसदेच्या मंचावरून काय बोलले गेले. ज्यावर तुम्ही सर्वांनी खूप टाळ्या वाजवल्या. महात्मा गांधी खरेच देशद्रोही होते का? टीव्हीवर रेकॉर्ड आहे तुम्ही सर्व पहा असा शब्द होता. खूप टाळ्या वाजवल्या. १९४७ ची ती घटना आठवा ज्या परिस्थितीत भारत स्वतंत्र झाला. महात्मा गांधींनी काय केले नाही? आता या धर्म संसदेतून त्यांच्याबद्दल असा प्रकार? हा आपला धर्म असू शकत नाही. मी तुम्हा सर्वांची माफी मागतो पण मी या धर्म संसदेपासून दूर आहे,” असे महंत रामसुंदर दास यांनी म्हटले.

धर्म संसदेच्या नावाखाली नरसंहाराची हाक; सर्वोच्च न्यायालयाच्या ७६ वकिलांनी सरन्यायाधीशांना लिहिले पत्र

कालिचरण महाराज भाषण देत होते तेव्हा काँग्रेस नेतेही या कार्यक्रमाला उपस्थित होते. पण, कोणीही काही बोलले नाही. गौ-सेवा आयोगाचे अध्यक्ष महंत रामसुंदर दास, महानगरपालिकेचे अध्यक्ष प्रमोद दुबे यांच्यासह अनेक काँग्रेस नेतेही येथे उपस्थित होते. या कार्यक्रमाला भाजपाचे नंदकुमार साई आणि सच्चिदानंद उपासनेही उपस्थित होते.

आता पाकिस्ताननेही भारताला सुनावलं; धर्म संसदेतल्या भाषणांवरून भारतीय अधिकाऱ्याकडे व्यक्त केली चिंता

कोण आहेत महंत रामसुंदर दास?

महंत रामसुदर दास यांना धर्मासोबतच राजकारणाचीही ओढ आहे. काँग्रेस पक्षाकडून ते आमदारही राहिले आहेत. सध्या ते छत्तीसगड गौ सेवा आयोगाचे अध्यक्ष आहेत. ते मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्याही जवळचे आहेत. महंत रामसुंदर दास हे नेहमी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यासोबत कार्यक्रमांमध्ये दिसतात. महंत सुंदरदास जेव्हा विधानसभेत बोलत असत तेव्हा त्यांचे म्हणणे सत्ताधारी आणि विरोधी पक्ष लक्ष देऊन ऐकत असत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raipur mahant ram sundar das boycotts dharma sansad after kalicharan maharaj bad words over mahatma gandhi abn