Man Threw Wife From Second Floor Of House : छत्तीसगडमधील रायपूरमध्ये एक निर्दयी घटना उघडकीस आली आहे. एका व्यक्तीने जेवण वाढायला उशीर केल्याचा आरोप करत पत्नीला घराच्या दुसर्‍या मजल्यावरून ढकलून दिल्याचे समोर आले आहे. याबाबत छत्तीसगड पोलिसांनी माहिती दिली आहे. यामध्ये ही पीडित महिला गंभीर जखमी झाली असून, तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकास नगर येथील सुनील जगबंधू या आरोपीने पत्नी सपनाला जेवण वाढण्यास सांगितले होते. मात्र, ती तिचा मोबाईल फोन वापरत होती त्यामुळे जेवण वाढण्यास उशीर झाल. यानंतर दोघांमध्ये वाद सुरू झाला. या वादातच सुनीलने पत्नीला त्यांच्या घराच्या दुसर्‍या मजल्यावरून ढकलून दिले.

दरम्यान या प्रकरणी गुढियारी पोलिसांनी आरोपी पती सुनीलच्या विरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे. सपनाची प्रकृती गंभीर असून तिला रायपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हे ही वाचा : भाजपा सुसाट… २०२३-२४ मध्ये मिळाल्या २२४४ कोटींच्या देणग्या

काय आहे नेमकं प्रकरण?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात सुनील जनबंधू हा मद्यपानाचा आहारी गेल्याचे समजले. तो दररोज मद्यपान करून रात्री उशिरा घरी परतत असे. मंगळवारी (२४ डिसेंबर) रात्री तो घरी आल्यानंतर सुनीलने पत्नीला जेवायला वाढायला सांगितले, त्यावेळी पत्नी मोबाईलमध्ये मग्न असल्याचे दिसले. फोनचा अति वापर करते म्हणून तो पत्नीशी भांडू लागला. त्यानंतर सुनीलने आपल्या ९ वर्षांच्या मुलीला मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी पत्नीने सुनीलला मुलीला मारहाण करण्यापासून रोखल्याने तो संतापला आणि तिला घराच्या दुसर्‍या मजल्यावरील बाल्कनीत नेले आणि अल्पवयीन मुलीसमोर तिला खाली फेकले.

हे ही वाचा : महिला सन्मान योजना नाकारणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार? दिल्लीच्या मुख्यमंत्री अतिशींनी दिला ‘हा’ मोठा इशारा

आरोपी अटकेत

पीडित महिला जमिनीवर पडल्यानंतर मोठा आवाज झाल्याने परिसरातील लोक काय झाले पाहण्यासाठी धावले तेव्हा, त्यांना सपना जमिनीवर पडल्याचे आढळळे. त्यानंतर त्यांनी तिला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल केले.

सुरक्षा रक्षक आणि मजुरीचे काम करणाऱ्या आरोपी सुनीलला खूनाच्या प्रयत्नाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.

Story img Loader