आगामी लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर उमेदवारांकडून करण्यात येणाऱ्या खर्चाची मर्यादा वाढण्याची शक्यता आहे. वाढती महागाई लक्षात घेऊन त्यादृष्टीने निवडणूक खर्चात वाढ करण्याबाबत निवडणूक आयोग चाचपणी करीत आहे. जानेवारी २०११ मध्ये निवडणूक आयोगाने प्रत्येक उमेदवाराला निवडणूक खर्चाची मर्यादा  २५ लाखांवरून ४० लाख रुपयांपर्यंत वाढवली होती.
आता खर्चाची मर्यादा ४० लाखावरून ५६ लाख करण्याचा विचार करीत आहे. मात्र त्याबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आलेला नसल्याचे निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. मोठय़ा राज्यांमध्ये उमेदवाराला सध्या निवडणूक खर्चाची मर्यादा ४० लाख रुपये आहे. गोव्यात प्रत्येक लोकसभेसाठी २२ लाख रुपये तर लक्षद्वीपमध्ये खर्चाची मर्यादा १६ लाख रुपयांपर्यंत आहे.

Story img Loader