पोलिसांच्या दबावामुळे आणि त्यांनी केलेल्या छळवणुकीमुळेच राजस्थान रॉयल्सचे सहमालक राज कुंद्रा यांनी आयपीएल सामन्यांत सट्टेबाजी केल्याची चुकीची कुबली दिल्याचे प्रतिज्ञापत्र कुंद्रा यांचे व्यावसायिक भागीदार उमेश गोएंका न्यायालयात सादर केले.
दिल्लीचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. के. खन्ना यांच्या न्यायालयात गोएंका यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले. या प्रतिज्ञापत्रामध्ये दिल्ली पोलिसांवर विविध आरोप करण्यात आलेत. साध्या वेशातील काही पोलिस दोन जूनला बेकायदापणे अहमदाबादला कुंद्रा यांच्या निवासस्थानी आले. त्यानंतर ते कुंद्रा यांना दिल्लीला घेऊन गेले. तेथे कुंद्रा यांची पोलिसांकडून छळवणूक कऱण्यात आली आणि त्यांना सट्टेबाजी केल्याची चुकीची कबुली देण्यास भाग पाडण्यात आल्याचा आरोप गोएंका यांनी केलाय.
कुंद्रा यांनी सट्टेबाजी केल्याची कबुली द्यावी, यासाठी त्यांना पोलिस चौकशीवेळी मारहाण करण्यात आली. अधिकाऱयांनी जोरात त्यांच्या श्रीमुखात भडकावल्यामुळे त्यांच्या कानाला इजा झाल्याचा दावाही गोएंका यांनी केला. पोलिसांनी चौकशीच्या नावाखाली विनाकारण कुंद्रा यांना पाच दिवस करोलबागेतील एका हॉटेलमध्ये आणि लोधी रस्त्यावरील दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेमध्ये अडकवून ठेवले, असाही आरोप गोएंका यांनी केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा