दिल्लीतील सामूहिक बलात्काराच्या घटनेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी परप्रांतियवादा रंग फासल्याने पुन्हा एकदा राजकीय वातावरण चांगलेच तापणार असे चित्र दिसत आहे. दिल्लीमधील बलात्काराची घटना निंदनीय आहेच, पण त्यामागील सूत्रधार हे बिहारचेच आहेत. यावर शीला दीक्षित, सोनिया गांधी किंवा इतर कोण का बोलत नाही, असा प्रश्न काल (शनिवार) राज ठाकरे यांनी मुंबईतील कोकण महोत्सवात उपस्थित केला. त्यानंतर त्याला प्रत्युत्त म्हणून, ‘राज ठाकरे यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे, मनसेसारख्या पक्षावर सरकारने बंदी घालावी’, अशी मागणी जेडीयूचे नेते आणि मंत्री गिरीराज सिंह यांनी केली आहे.
राज ठाकरे परप्रांतियांबद्दल बोलले तर त्याचं भआंडवल केलं जातं पण दिल्लीत सामूहिक बलात्कारामध्ये सहभागी असेलेल सर्वजण बिहारचे होते, हा मुद्दा दुर्लक्षित कसा करून चालेल, असा प्रश्न राज ठाकरे यांनी विचारला होता. फक्त दिल्ली, महाराष्ट्रातच नव्हे तर जिथे जिथे बिहारमधील लोक जातात तेथे गुन्हागारी वाढल्याचं दिसतं, असंही ते पुढे म्हणाले.
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करा, असंही गिरीराज सिंह म्हणाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा