भारत हा हिंदूंचा देश आहे, हिंदुत्ववाद्यांचा नाही असे वक्तव्य काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी केले आहे. महागाईविरोधात जयपूरमध्ये सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुध्ये काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी, माजी अध्यक्ष राहुल तसेच पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी सहभागी झाल्या होत्या. या देशात हिंदुत्ववाद्यांमुळे महागाई वाढत आहे. जनतेला त्रास होत आहे. सात वर्षांत पंतप्रधानांच्या तीन ते चार उद्योगपती मित्रांनी देशाचे वाटोळे केले आहे असा आरोप राहुल यांनी केला. तसेच देशाच्या राजकारणात आज दोन शब्दांची एकमेकांसोबत टक्कर आहे. एक शब्द हिंदू आणि दुसरा शब्द हिंदुत्व. मी हिंदू आहे, हिंदुत्ववादी नाही,” असेही राहुल गांधी यांनी म्हटले. याबाबत बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“राहुल गांधी यांचे वक्तव्य मी वाचले. मी हिंदू आहे पण हिंदुत्ववादी नाही आणि या देशामध्ये हिंदूंचे राज्य आले पाहिजे. मग आता काय आफ्रिकन लोक राज्य करत आहेत का?,” असा सवाल राज ठाकरेनी विचारला आहे.
“लोकांवर अरेरावी करण्यासाठी राज्य दिलेलं नाही ” ; राज ठाकरेंचा अनिल परबांवर निशाणा!
दरम्यान, हिंदुत्ववादी सत्तेसाठी हयात घालवतात. त्यांना सत्याशी काही देणेघेणे नसते अशी टीका राहुल यांनी केली. सत्ताग्रह हा त्यांचा मार्ग असतो, सत्याग्रह नव्हे असा टोलाही लगावला. हिंदू मात्र निर्भीडपणे सामोरा जातो, एक इंचही मागे हटत नाही. मी हिंदू आहे, हिंदुत्ववादी नाही असे राहुल यांनी सांगितले.
तुमचा राग कधी व्यक्त करणार?; पेपरफुटी प्रकरणी राज ठाकरेंनी मांडली भूमिका
देशातील ९० टक्के नफा हा २० टक्के कंपन्या कमावत असल्याचा आरोपही राहुल यांनी केला. काँग्रेस सरकारांनी कृषीकर्जे माफ केली. कारण शेतकरी देशाचा कणा आहे. मात्र मोदींनी शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला, असे राहुल म्हणाले. चीनने लडाख, अरुणाचल प्रदेशमध्ये भारताचा भूभाग बळकावला असून, पंतप्रधान म्हणतात, काहीच घडले नाही असा आरोप राहुल यांनी केला. यावेळी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल उपस्थित होते.
“सीडीएस बिपिन रावत यांचा मृत्यू हा आपल्यासाठी दिसणारा अपघात आहे. समजा घातपात असेल तर तो बाहेर येणार आहे का? आपल्या देशामध्ये प्रश्न निर्माण होतात उत्तरे सापडत नाहीत,” असेही राज ठाकरे म्हणाले.