गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशातील नेते रघुराज प्रताप सिंह उर्फ राजा भैय्या चर्चेत आहेत. बाहुबली अशी ओळख असणारे राजा भैय्या कुंडा विधानसभा मतदारसंघातून ७ वेळा निवडून आले आहेत. पण, अलीकडे राजकीय नाहीतर कौटुंबिक वादामुळे राज भैय्या चर्चेत आले आहेत. हा वाद आहे पत्नी भानवी सिंह यांच्याशी संबंधित.
पत्नी भानवी सिंह यांनी राजा भैय्या यांच्यावर एका पाठोपाठ एक गंभीर आरोप केले आहेत. यानंतर ही गोष्टी घटस्फोटापर्यंत पोहचली होती. पण, आता भानवी सिंह यांनी घटस्फोट देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे हे प्रकरण नक्की काय आहे? जाणून घेऊया…
हेही वाचा : मित्रांनीच केली मित्राचं अपहरण, खंडणी न मिळाल्याने रसगुल्ला खाण्याची शेवटची इच्छा पूर्ण करत घेतला जीव
राजा भैय्या आणि पत्नी भानवी सिंह यांच्या घटस्फोटावर दिल्लीतील साकेत न्यायालयात सुनावणी सुरु आहे. अलीकडेच भानवी सिंह यांनी आपलं प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केलं. त्यामध्ये शारीरिक आणि मानसिक शोषणासह एक महिला पत्रकाराबरोबर राज भैय्या यांचे संबंध असल्याचा आरोप भावनी सिंह यांनी केला होता.
‘आज तक’शी बोलताना भावनी सिंह म्हणाल्या, “राज भैय्या यांनी महिला पत्रकाराबरोबर असलेल्या संबंधामुळे मला घरातून बाहेर काढलं होतं. तसेच, मला सासरी सुद्धा येऊ दिलं नाही. ते माझ्या मुलांचे वडील आहेत. त्यामुळे मी घटस्फोट देणार नाही. मला घटस्फोट नको आहे. मुलांच्या रक्षणासाठी सर्व प्रयत्न करणार आहे.”
हेही वाचा : “लग्न झालंय म्हणून पत्नीला मारहाण करण्याचा पतीला अधिकार नाही!” हायकोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी
“राजा भैय्या यांनी घटस्फोटाची केस दाखल केली आहे. मग, मी माझे घर का सोडू? दुसरे कोणीतरी घरात येऊन राहू लागलं आहे. तर, मी घटस्फोट का देऊ? मी घटस्फोट देणार नाही,” असं भावनी सिंह यांनी स्पष्ट केलं.
भावनी सिंह यांनी राजा भैय्यांवर गंभीर आरोप केले आहेत. राजा भैय्यांचे अनेक महिलांबरोबर अवैध संबंध असल्याचा भावनी सिंह यांचा दावा आहे. यास विरोध केल्यावर गोळीबार करत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचंही भावनी सिंह यांनी सांगितलं होतं.
राज भैय्या मुलांकडे दुर्लक्ष करत असून, मुलांचा संपूर्ण खर्च आपण उचलत आहे, असं भावनी सिंह यांनी म्हटलं. तर, भावनी सिंह यांना संपत्ती हडप करायची आहे, असं राजा भैय्या म्हणाले.