शिवसेना खासदारांनी महाराष्ट्र सदनातील कर्मचाऱयाचा रोजा मोडण्याचा प्रयत्न केल्याचे प्रकरण आणखी तापणार असल्याची शक्यता आहे. या सर्व प्रकरणी शिवसेनेच्या निशाण्यावर असलेले महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त बिपीन मलिक यांच्याविरोधात आता हक्कभंगाचा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. बुधवारी संध्याकाळपर्यंत शिवसेनेकडून हक्कभंग प्रस्ताव मांडण्याची नोटीस लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्याकडे देण्यात येईल, अशी माहिती मिळाली आहे. शिवसेना खासदार अरविंद सावंत यांच्याकडून हा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे.
दरम्यान, केटरिंग व्यवस्था पाहणाऱया कर्मचाऱयाला चपाती भरविण्याच्या प्रकरणाला जातीय रंग आल्याने शिवसेना खासदार राजन विचारे यांनी याप्रकरणी माफी मागितली. माझ्या वर्तणुकीमुळे कोणत्याही मुस्लिम युवकाच्या भावना दुखावल्या असतील, तर आपण खेद व्यक्त करतो, असे राजन विचारे यांनी म्हटले आहे. ते म्हणाले, गेल्या दोन महिन्यांपासून महाराष्ट्र सदनातील कोणतीही सुविधा व्यवस्थित नाही. येथे मिळणाऱया भोजनाचा दर्जा चांगला नाही. याबाबत आपण वारंवर निवासी आयुक्तांकडे तक्रार केली आहे.

Story img Loader