Rajasthan By-Election Updates Deoli-Uniara Assembly constituency : राजस्थानच्या टोंक जिल्ह्यातील देवळी-उनियारा मतदारसंघात बुधवारी (१३ नोव्हेंबर) पोटनिवडणूक पार पडली. येथून निवडणुकीला उभे राहिलेले अपक्ष उमेदवार नरेश मीना यांनी काल मतदानाच्या दिवशी उपविभागीय दंडाधिकारी अमित चौधरी यांच्या कानशीलात लगावल्याचा प्रकार समोर आला. त्यामुळे मतदारसंघात तणाव निर्माण झाला आहे. स्थानिकांच्या मागण्यांवरून चौधरी व नरेश मीना यांच्यात वाद चालू होता. त्याचदरम्यान, मीना यांचं स्वतःवरील नियंत्रण सुटलं आणि त्यांनी थेट उपविभागीय दंडाधिकाऱ्यांवर हल्ला केला. मीना यांनी चौधरी यांच्या कानशीलातही लगावली. त्यानंतर मीना यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्याचवेळी मीना यांच्या शेकडो समर्थकांनी हिंसक निदर्शने केली. त्यामुळे पोलिसांना त्यांचं काम करता येत नव्हतं. मीना यांच्या समर्थकांनी परिसरातील अनेक वाहनं पेटवली, पोलिसांच्या वाहनांवर दगडफेकही केली. त्यामुळे पोलिसांना आंदोककांवर अश्रू धुराचा मारा करावा लागला. हे हिंसक आंदोलन मोडून काढत पोलिसांनी अखेर आज सकाळी मीना यांना अटक केली आहे.
Rajasthan By-Election : अपक्ष उमेदवाराची अधिकाऱ्याला मारहाण; कार्यकर्त्यांकडून पोलिसांवर दगडफेक, वाहनं पेटवली, जिल्ह्यात तणाव
Rajasthan By-Election Updates : हिंसक आंदोलन करणाऱ्यांवर पोलिसांकडून अश्रू धुराचा मारा
Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 14-11-2024 at 14:33 IST
© IE Online Media Services (P) Ltd
© IE Online Media Services (P) Ltd
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajasthan by election independent candidate assault sdm stone pelting on police vehicles set fire in deoli uniara asc