राजस्थानमधील काँग्रेस सरकारला शुक्रवारी चार वर्ष पूर्ण झाली. या निमित्ताने राजस्थानमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, या पार्श्वभूमीवर आज राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारच्या कामाबद्दल माहिती दिली. तसेच केंद्रातील मोदी सरकार राज्याच्या कारभारात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप त्यांनी केला. याचबरोबर सरकारला चार वर्ष पूर्ण होऊनही राज्यातील जनता सरकारच्या पाठिशी असल्याचेही ते म्हणाले.

हेही वाचा – समान नागरी कायद्यापाठोपाठ लोकसंख्या नियंत्रण भाजपच्या कार्यक्रम पत्रिकेवर; राज्यसभेच्या खासगी प्रस्तावांच्या यादीत समावेश

justice shekhar yadav controversial statement
अन्वयार्थ : ‘सांविधानिक भावना दुखावण्या’पल्याड…
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
impeachment motion against justice Shekhar Yadav
अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींविरोधात महाभियोगाची शक्यता; महाभियोग म्हणजे काय? आजवर किती न्यायाधीशांवर झाली कारवाई?
State Government approved one time transfer for Community Health Officers under National Health Mission
आता समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्याही बदल्या होणार
anti-ragging rules, non-compliance of anti-ragging rules, National Medical Commission,
रॅगिंगविरोधी नियमांचे पालन न केल्यास कठोर कारवाई, राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाचा वैद्यकीय महाविद्यालयांना इशारा
43 ministers maharashtra
विश्लेषण : महाराष्ट्रात ४३ मंत्रीच? मंत्रिमंडळात मंत्र्यांची संख्या किती असते? या संख्येवर बंधने का असतात?
Rahul Gandhi Protest against modi shah
मोदी-अदाणीविरोधात काँग्रेस आक्रमक; राहुल गांधींच्या अनोख्य आंदोलनाने वेधले लक्ष
शिवसेनेत अडीच-अडीच वर्षे मंत्रिपदे ?
शिवसेनेत अडीच-अडीच वर्षे मंत्रिपदे ?

नेमकं काय म्हणाले अशोक गेहलोत?

“राजस्थानमध्ये काँग्रेसला सत्तेत येऊन चार वर्ष झाली आहेत. मात्र, आजही राज्यातील जनता सरकारच्या पाठिशी आहे. अनेक ठिकाणी सरकारला चार वर्ष झाल्यानंतर जनता सरकारच्या विरोधात गेल्याचे दिसून येते. मात्र, राजस्थानमध्ये या उलट परिस्थिती आहे. आमच्यासाठी यापेक्षा मोठं यश दुसरं कोणतंही असू शकत नाही”, अशी प्रतिक्रिया अशोक गेहलोत यांनी दिली.

“जुन्या पेन्शनबाबत एकसमान धोरण असावे”

पुढे बोलताना ते म्हणाले, “जुन्या पेन्शन योजनेबाबत देशभरात एकसमान धोरण असले पाहिजे. ज्या व्यक्तीने ३५ वर्ष सरकारची सेवा केली. त्याच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होणं योग्य नाही. या विषयावर व्यापक चर्चा व्हायला पाहिजे. तसेच यासाठीचे आर्थिक नियोजन केंद्र आणि राज्य सरकारने मिळून करावं.”

“मोदी सरकारकडून राज्याच्या कारभारात हस्तक्षेप”

यावेळी बोलताना त्यांनी मोदी सरकार राज्याच्या कारभारात हस्तक्षेप करत असल्याचाही आरोप केला. “राजस्थानमध्ये आम्ही जुनी पेन्शन योजना लागू केली होती. मात्र, केंद्र सरकारने यात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. मुळात संविधानानुसार पेन्शनबाबत निर्णय घेण्याचा अधिकार राज्य सरकारचा आहे. केंद्र सरकार यात हस्तक्षेप करू शकत नाही”, असे ते म्हणाले.

हेही वाचा – माना पाव में छाले है, हम नही रुकनेवाले है; १०० दिवसानंतर भारत जोडो यात्रेत पुन्हा नवा उत्साह !

“मोदी सरकार प्रकल्पांकडे जाणीवपूर्वक दुर्लेक्ष”

पुढे बोलताना त्यांनी केंद्र सरकारवरही टीका केली. “पंतप्रधान मोदी यांनी गेल्या निवडणुकीदरम्यान पूर्ण राजस्थानमधील कालवा प्रकल्पाचे काम लवकरात लवकर पूर्ण करणार असल्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आता केंद्र सरकार जाणीवपूर्वक या प्रकल्पांकडे दुर्लेक्ष करत आहे. राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसूंधराराजे आणि केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांच्यात मतभेद असून त्यामुळेच अनेक प्रकल्पांची कामे रखडली असल्याची ते म्हणाले. तसेच दोघांच्या भांडणाचा त्रास जनतेने का भोगावा”, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

Story img Loader