राजस्थानातील निवडणूक प्रचार आता टिपेला पोचला आह़े  १ डिसेंबरला होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी भाजपकडून पक्षाची सारी मदार गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार वसुंधरा राजे या बिनीच्या शिलेदारांवर ठेवण्यात आली आह़े  सत्तारुढ काँग्रेसने मात्र वेगळी खेळी करीत आपल्या स्थानिक सुभेदारांवरच सारी भिस्त ठेवलेली दिसून येत आह़े
मुख्यमंत्रीपद हाती असतानाही काँग्रेस आपली सत्ता टिकवण्याबाबत आणि नेतृत्वाबाबतही संदिग्ध असल्याचे दिसून येत आह़े  त्यामुळे काँग्रेसने ठिकठिकाणच्या आपल्या नेते आणि पदाधिकाऱ्यांवर विसंबण्याचा प्रयत्न केला आह़े गेहलोत यांच्या कार्यकाळातील विविध विकास योजनांवर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात भर दिला होता. भाजपने मोदींच्या सभांवर भर दिला आहे.