Asaram Bapu : राजस्थान उच्च न्यायालयाने मंगळवारी आसाराम बापू (८६) याला २०१३ च्या बलात्कार प्रकरमात अंतरिम जामीन मंजूर केला आहे. एका महिला अनुयायीवर बलात्कार केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूला प्रकृतीच्या कारणास्तव सर्वोच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यातच ३१ मार्च पर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला होता, त्यानंतर उच्च न्यायालयाचा हा निर्णय आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

राजस्थान उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दिनेश मेहता आणि विनित कुमार माथूर यांच्या खंडपीठाने वैद्यकीय कारणास्तव शिक्षा (एसओएस) तात्पुरती स्थगित करण्यास परवानगी दिली असल्याची माहिती आसारामच्या वकिलांनी दिली आहे. १२ वर्षांपूर्वी २०१३ मध्ये आसारामला अटक झाल्यानंतर तो जामिनावर तुरुंगाबाहेर पडण्याची ही पहिलीच वेळ आहे.

“आम्ही रेग्युलर एसओएस अर्ज केला होता, मात्र सर्वोच्च न्यायालयाने देखील त्याला तात्पुरता एसओस मंजूर केला होता. त्यामुळे गुजरातच्या प्रकरणात आम्ही जरी रेग्युलर एसओएस अर्ज दाखल केला असली तरी आम्ही तो वैद्यकीय कारणासाठीच सादर केला आहे आणि याच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयाने मंजूर केलेल्या ३१ मार्चपर्यंतच्या जामीनाची मागणी केली”, आसारामचे वकील निशांत बोरा यांनी इंडियन एक्सप्रेसला ही माहिती दिली.

बोरा म्हणाले की, “आम्ही म्हणालो की तो (आसाराम बापू) ८६ वर्षांचा आहे, त्याला अनेक अजारांनी ग्रासले आहे आणि त्याला कित्येकदा रुग्णालयात नेण्यात आले आहे, तसेच त्याला अनेकदा उपचारासाठी पॅरोल देखील देण्यात आली आहे. तसेच आम्ही सांगितले की सर्वोच्च न्यायालयाने देखील फक्त वय आणि आजारपण याच्या आधारावरच ही मुभा दिली आहे. त्यामुळे असाच आदेश या न्यायालयाकडून मिळाला नाही तर सर्वोच्च न्यायालयाचा आदेश व्यर्थ जाईल”. त्यानंतर न्यायालयाने याला मान्यता देत, सर्वोच्च न्यायालयाने ठरवून दिलेल्या अटींवरच सोडले जाईल असे सांगितले, असेही बोरा म्हणाले.

आसाराम आपल्या अनुयायांना भेटू शकत नाही, कोणतेही प्रवचन देऊ शकत नाही किंवा माध्यमांशी बोलू शकत नाही, या सर्वोच्च न्यायालयाने घातलेल्या अटी या काळात त्याला लागू असणार आहेत. तसेच आसाराम बापूला तीन सुरक्षा रक्षक देण्यात आले आहेत, आणि जर तो जोधपूरच्या बाहेर गेला, तर त्या रक्षकांचे राहणे आणि इतर खर्च आसारामला स्वत: करावा लागेल ,अशी माहितीही बोरा यांनी दिली म्हणाले.

गेल्या वर्षी ऑगस्टपासून आसाराम बापूला पॅरोल आणि पुण्यातील रुग्णालयात जाण्यासाठी अनेकदा मुदतवाढ मिळाली आहे. मात्र पॅरोलप्रमाणे आसाराम जामिनावर बाहेर आल्यानंतर त्याच्या हालचालींवर कोणतेही बंधन राहणार नाही. सध्या कोठडीत असताना त्याच्यावर जोधपूरच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आसारामला जोधपूर न्यायालयाने एप्रिल २०१८ मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती, ज्यामध्ये त्याला २०१३ मध्ये त्याच्या एका आश्रमात १६ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते.