जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये १८ मे रोजी दहशतवाद्यांनी एका पर्यटक जोडप्यावर हल्ला करत गोळ्या झाडल्या होत्या. यामध्ये हे पर्यटक जोडप गंभीर जखमी झालं होतं. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ते राजस्थानच्या जयपूर येथील आहेत. यामध्ये जखमी झालेल्या महिलेचे नाव फराह तर तिच्या पतीचे नाव तबरेज असे आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, हे पर्यटक जोडपं जम्मू-काश्मीरमध्ये फिरण्यासाठी आले होते. ते एका रिसॉर्टमध्ये थांबले असता दहशतवादी हल्ला. त्यामध्ये ते जखमी झाले होते. या घटनेत जखमी झालेल्या महिलेची प्रतिक्रिया समोर आली असून त्यांच्यावर दहशतवादी हल्ला कसा झाला? याबाबत थरारक अनुभव सांगितला आहे.
घटनेतील महिलेने काय प्रतिक्रिया दिली?
“मी आणि माझे पती १३ मे रोजी जयपूरवरून जम्मू-काश्मीरला फिरायला गेलो होतो. त्यानंतर जम्मू-काश्मीर फिरून आल्यानंतर १८ मे रोजी एका हॉटेलमध्ये थांबण्यासाठी गेलो. आम्ही सर्वजण मिळून ५० जण होतो. आम्ही हॉटेलमध्ये जात असताना सर्वात शेवटी आम्ही होतो. तितक्यात दहशतवाद्यांनी आमच्यावर गोळ्या झाडल्या. त्यामध्ये माझ्या पतीला आणि मला पाठीमागून गोळी लागली. मी माझ्या मुलाला वाचवत असताना मला गोळी लागली. त्यानंतर आमच्याबरोबर असणाऱ्या लोकांनी आम्हाला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. मी सध्या ठीक आहे. मात्र, माझ्या पतीचे दोन्हीही डोळे डॅमेज झाले असून त्यांना दिसत नाही. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मी विनंती करते की, माझ्या पतीचे डोळे व्यवस्थित करण्यासाठी मदत मिळावी”, अशी प्रतिक्रिया घटनेतील महिलेने दिली.
#WATCH | Jaipur, Rajasthan | Farha, the woman who was shot at by terrorists in J&K's Anantanag says, "My husband and I had gone to Kashmir on 13th May. On 18th May, when we reached our hotel, we were shot at by terrorists. While I was trying to protect my son from fire, I got… pic.twitter.com/P9xlLUaFEF
— ANI (@ANI) May 23, 2024
हेही वाचा : २२ हत्या करणारा किस्सू तिवारी साधूच्या वेशात रामलल्लाच्या दर्शनाला गेला, पोलिसांनी केली अटक, नेमकं घडलं काय?
गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये अनेकदा दहशतवाद्यांनी गोळीबार केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. १८ मे रोजी जयपूरच्या एका पर्यटक जोडप्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता. त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले. आता त्याच दिवशी पियान जिल्ह्यात हुरपोरा भागात माजी सरपंच एजाज अहमद शेख यांच्यावरही दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या होत्या. ऐन लोकसभा निवडणुकीत अशा घटना घडल्यामुळे तेथे तणाव निर्माण झाला होता.
गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये अनेकदा दहशतवाद्यांनी गोळीबार केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. १८ मे रोजी जयपूरच्या एका पर्यटक जोडप्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता. त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले. आता त्याच दिवशी पियान जिल्ह्यात हुरपोरा भागात माजी सरपंच एजाज अहमद शेख यांच्यावरही दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या होत्या. ऐन लोकसभा निवडणुकीत अशा घटना घडल्यामुळे तेथे तणाव निर्माण झाला होता. तसेच काही दिवसांपूर्वी जम्मू काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यात भारतीय हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवादी हल्ला झाला होता. त्यामध्ये काहीजण जखमी झाले होते. दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये अशा घटना घडत असल्यामुळे अनेकदा तेथे तणावाचे वातावारण निर्माण होतं. त्यामुळे नागरीकांना त्रासाला सामोरं जावं लागतं.