राजस्थानात एक थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. येथे एका तरूणीच्या अंगावर कार घालण्यात आली आहे. या धडकेत तरूणीचा मृत्यू झाला आहे. तर, एक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. ही धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
उमा सुथार असं मृत तरूणीचं नाव आहे. तर, मंगेश असं आरोपीचं नाव आहे. उमा सुथार ही मूळची मध्य प्रदेशची रहिवाशी होती. ती जयपूरमध्ये इव्हेंट मॅनेजमेटचे काम करायची.
हेही वाचा : “आधी साखळीनं बांधलं, नंतर ब्लेडनं हल्ला केला अन्…”, एकतर्फी प्रेमातून तरुणानं केली २५ वर्षीय तरुणीची हत्या
मंगळवारी रात्री उशिरा उमा सुथार आणि मंगेश पार्टीनंतर नाईट क्लबमधून बाहेर पडली होती. तेव्हा मंगेश आणि उमामध्ये जोरदार वाद झाला. यानंतर मंगेश कारमध्ये बसून चालला होता. यावेळी उमा आणि तिच्यासह असलेल्या एका व्यक्तीनं मंगेशची कार अडवण्याचा प्रयत्न केला. पण, मंगेशने कोणतीही तमा न बाळगता उमा आणि तिच्याबरोबर असलेल्या व्यक्तीवर कार घातली आणि निघून गेला.
हेही वाचा : “पत्नीचे पतीवर प्रतारणेचे निराधार आरोप हे मानसिक क्रौर्य”, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल!
या जोरदार धडकेत उमाचा मृत्यू झाला आहे. तर, तिच्याबरोबर असलेला व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. यानंतर मंगेश फरार झाला आहे. पोलीस मंगेशचा शोध घेत असून पुढील चौकशी सुरू आहे.