काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसतर्फे ‘भारत जोडो यात्रे’चे आयोजन करण्यात आले आहे. कन्याकुमारी ते काश्मीर असा या यात्रेचा मार्ग आहे. ही यात्रा महाराष्ट्रासह इतर अनेक राज्यांमधून जाणार आहे. असे असतानाच राजस्थानमधील मंत्र्याने राहुल गांधी यांची तुलना प्रभू श्रीराम यांच्याशी केली आहे. राहुल गांधी यांची पदयात्रा ऐतिहासिक आहे. भगवान श्रीराम हेदेखील श्रीलंकेपर्यंत पायी गेले होते, असे राजस्थानचे मंत्री परसादी लाल मीना म्हणाले आहेत. एएनआयने याबाबतचे वृत्त दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> “हम्म, तुला तर तेच पाहिजे” शिखर बँक घोटाळा प्रकरणावर प्रश्न विचारताच अजित पवार स्पष्टच बोलले; म्हणाले “आता सरकार… “

“राहुल गांधी यांची पदयात्रा ही ऐतिहासिक असणार आहे. भगवान राम यांनीदेखील श्रीलंकेपर्यंत पायी प्रवास केला होता. राहुल गांधी कन्याकुमार ते काश्मीर असे त्यापेक्षाही जास्त अंतर चालणार आहेत. आतापर्यंत असा प्रवास कोणीही केलेला नाही. देशाला बदलण्यासाठी, देशातील वातावरणात बदल करण्यासाठी, सांप्रदायिकतेला संपवण्यासाठी राहुल गांधी यांची ही यात्रा आहे,” असे परसादी लाल मीना म्हणाले आहेत.

हेही वाचा >>> VIDEO: Helicopter Crash In Kedarnath : केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं, सहाजणांचा मृत्यू

परसादी लाल मीना यांच्या या विधानावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधी सध्या पदयात्रा करत आहेत. त्यांच्या या यात्रेत लोक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. राहुल गांधी यांची प्रभू श्रीराम यांच्याशी तुलना करण्यात आलेली नाही. रामजी आणि राहुल गांधी यांच्या नावत सुरुवातीला ‘रा’ हे अक्षर येते. हा योगायोग म्हणता येईल. मात्र आम्ही रामजी आणि राहुल गांधी यांच्याशी तुलना करत नाहीयेत. राहुल गांधी एक माणूस आहेत. प्रभू राम हे देव आहेत. राहुल गांधी यांच्याकडे देश पाहात आहे. जगभरातील लोक या यात्रेकडे पाहात आहेत. देशाला, संविधानाला वाचवण्यासाठी ही यात्रा आहे, असे नाना पटोले म्हणाले.