गुरुग्राममध्ये ८ वर्षांच्या मुलाची शाळेच्या स्वच्छतागृहातच हत्या झाल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असतानाच, राजस्थानमधील सिकर येथे अल्पवयीन मुलीवर शाळा संचालक आणि शिक्षकानेच बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. बळजबरीने पीडित मुलीचा गर्भपात केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणी पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सिकर जिल्ह्यातील अजीतगढमध्ये १२ वीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर शाळा संचालक आणि शिक्षकाने बलात्कार केला. यातून पीडित मुलगी गरोदर राहिली. नराधम शाळा संचालक आणि शिक्षकाने पीडितेला एका रुग्णालयात नेले आणि तिचा गर्भपात केला. घरी परतल्यावर रक्तस्त्राव सुरू झाल्यानंतर तिला पालकांनी जयपूरच्या रुग्णालयात नेले. त्यावेळी तिचा गर्भपात झाल्याचे डॉक्टरांनी पालकांना सांगितले. या प्रकरणी पालकांनी शाळा संचालक आणि शिक्षकाविरोधात तक्रार केली. यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शाळा संचालक आणि शिक्षक दोघेही फरार आहेत.

राजस्थानमध्ये विद्यार्थिनीवर बलात्काराची ही आठवडभरातील दुसरी घटना आहे. यापूर्वी बारमेरमध्ये सहा वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना उघडकीस आली होती. शाळेतील सफाई कामगारांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला होता. या घटनेचा सर्वच स्तरातून निषेध करण्यात आला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajasthan minor allegedly gangraped by school director and teacher in sikar forced victim to undergo abortion